Home ताज्या घडामोडी परतवाडा येथे शेजाऱ्यांनी केला डॉक्टरवर हल्ला ; दोघांना अटक

परतवाडा येथे शेजाऱ्यांनी केला डॉक्टरवर हल्ला ; दोघांना अटक

अमरावती
जिल्ह्यातील परतवाडा शहरात शुक्रवारी डॉ. विजय वर्मा या नामांकीत डॉक्टरवर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पिता-पुत्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात डॉकटरच्या दोन्ही पायांना जबर मार लागला असून पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.

परतवाडा येथिल पट्टलवर लाईन परिसरात डॉ. विजय वर्मा यांचे निवासस्थान आहे.त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दादाराव आखरे आणि त्यांचा मूलगा राहुल आखरे यांनी घराबाहेर पडलेल्या डॉ.विजय वर्मा यांना मारहाण केली. यावेळी दादाराव आखरे याने डॉ. विजय वर्मा यांच्या} डोक्यावर काठी मारली तर राहुलने लोखंडी रोडने डॉ. वर्मा यांच्या दोन्ही पायांवर केलेत. यावेळी डॉ. वर्मा यांच्या पत्नी आणि मुलाने हल्लेखोरांच्या तावडीतून डॉ. विजय वर्मा याना कसे बसे सोडविले. गंभीर जखमी असणाऱ्या डॉ. विजय वर्मा यांना परतवाडा येथील डॉ. तपन रावत यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान डॉ. वर्मा आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आखरे कुटुंबात बऱ्याच वर्षणावसून वाद आहे. मध्यंतरी आखरे पिता-पुत्रांनी डॉ. वर्मा यांच्या पत्नीलाही मारहाण केली होती. आता डॉ. विजय वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला झल्यावर शहरात खोबल उडाली असताना पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments