Home ताज्या घडामोडी संत गाडगे बाबा विद्यापीठाने निर्गमित केलेल्या निदेशानुसार होणार परीक्षा ; उच्च न्यायालयाचा...

संत गाडगे बाबा विद्यापीठाने निर्गमित केलेल्या निदेशानुसार होणार परीक्षा ; उच्च न्यायालयाचा आदेश

अमरावती.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्या परिषद व परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उन्हाळी 2020 परीक्षा विद्यापीठाने 24 ऑक्टोबर,2020 रोजी निर्गमित केलेल्या निदेशाप्रमाणे परीक्षा प्रक्रियेची कार्यवाही करावी व दि. 24 नोव्हेंबर पर्यंत विद्यापीठाने आपली बाजू मांडावी व त्यानंतर अंतीम निर्णय देण्यात येईल. असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात आज स्पष्ट केले.

26 ऑक्टोबर, 2020 पासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. परीक्षा प्रक्रिये विरोधात श प्रिती राहुल तायडे उर्फ कु. प्रिती बबनराव मते या विद्यार्थीनीने मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती.
विद्यापीठाने 24 ऑक्टोबर रोजी परीक्षा संचालनासाठी निर्गमित केलेला निदेश रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्ती विद्यार्थीनीने माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली होती. त्यावर . 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने सुनावणी घेवून त्यामध्ये विद्यापीठाकडून घेतल्या जात असलेल्या परीक्षेला स्थगनादेश न देता विद्यापीठाने 24 ऑक्टोबर, 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या निदेशानुसार परीक्षा संचालन व निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments