Home ताज्या घडामोडी खोडरबरमध्ये लपवून विमानात आणले 7 लाख 89 हजाराचे सोने

खोडरबरमध्ये लपवून विमानात आणले 7 लाख 89 हजाराचे सोने

पुणे 

कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावरून 151.82 ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त केलेले हे सोने 24 कॅरेट असून त्यांची किंमत 7 लाख 89 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. 29 ऑक्टोबरला दुबईहून पुणे येथे आलेल्या एका प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर हे सोने जप्त केले असुन एका व्यक्तीने चक्क खोड रबरमध्ये लपवून हे सोने आणल्याने विमानतळावर खळबळ उडाली.

दुबईवरून येणाऱ्या प्रवाशाने हे सोने मोठ्या खोड रबरामध्ये लपवून ट्रॉली बॅगच्या हँडलमध्ये लपविले होते. तसेच आणखी एक खोड रबर चॉकलेट बारमध्ये लपवण्यात आले होते. कस्टम विभागाने या सर्व वस्तू जप्त केल्या आणि त्यांची तपासणी केली असता ही तस्करी उघडकीस आली. कस्टम विभागाने हे सर्व सोने जप्त केले असून पुढील कारवाई केली जात आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments