Home ताज्या घडामोडी जेम्स बॉण्ड' साकारणारे सीन कॉनेरी यांचं निधन

जेम्स बॉण्ड’ साकारणारे सीन कॉनेरी यांचं निधन

लंडन

जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सर सीन कॉनेरी यांचम वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांनी डॉक्टर नो, फ्रॉम रशिया विथ लव, गोल्डफिंगर,थंडरबॉल, यू ओनली लिव ट्वाइस, डायमंड्स आर फॉरेवर  या सात सिनेमात बॉण्डची भूमिका साकारली होती.

स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या सीन यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब्ज यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं. यात जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या कलाकारांमध्ये सर्वात आवडता अभिनेता कोण याचंही सर्वेक्षण झालं. यात सर सीन कॉनेरी पहिल्या क्रमांकावर होते. सीन कॉनेरी यांना ४४ टक्के मतं मिळाली. टिमोथी डाल्टन ३२ टक्के मतांनी दुसरे आणि पिअर्स ब्रॉन्सन २३ टक्के मतांनी तिसऱ्या स्थानावर होते.

सर सीन यांच्या अन्य सिनेमांमध्ये ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, ‘इंडियाना जोन्स आणि द लास्ट क्रूसेड’ आणि ‘द रॉक’ या सिनेमांचा समावेश आहे. सर सीन यांना १९८८ मध्ये ‘द अनटचेबल्स’ साठी ऑस्कर मिळाला होता. या सिनेमात त्यांनी आयरिश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

सर सीन कॉनेरी यांना १९५६ मध्ये बीबीसी प्रॉडक्शनच्या सिनेमात कास्ट करण्यात आलं होतं. या एका संधीनंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सीन कॉनेरी यांनी अभिनेत्री डियान क्लिंटोशी लग्न केलं. त्यानंतर १९७६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर सीन कॉनेरी यांनी दुसरं लग्न केलं होतं.

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments