Home ताज्या घडामोडी आचारसंहिता भंग केल्याचे प्रकरण: गृहराज्यमंत्री अनिल देशमुख आणि खासदार नवनीत राणा...

आचारसंहिता भंग केल्याचे प्रकरण: गृहराज्यमंत्री अनिल देशमुख आणि खासदार नवनीत राणा दोषमुक्त

अमरावती

लोकसभा निवडणूकिदरम्यान आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवनीत कौर राणा यांच्यासह 16 जणांची दोष मुक्त ठरविले आहे.

खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना आचारसंहितेच भंग झाल्याचा ठपका ठेवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह 16 जणांवर अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यावर निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले. फिर्यादी पक्षानं या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षानं केलेली याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळालं होती. नवनीत कौर राणा यांना भव्या रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बाबा राठोड, हर्षवर्धन देशमुख, गणेश खारकर, संगीता ठाकरे, अभिनंदन पेंढारी, पुष्पाताई बोंडे, सुनील वऱ्हाडे, रामेश्वर अभ्यंकर, गणेश राय, जितु दुधाने, ज्योती सैरासे, प्रशांत कांबळे,. रसीद खा हिदायत खा आदी यावेळी उपस्थित होते. नवनीत कौर यांनी आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी गाडगे नगर पोलिस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असताना रॅली काढून आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी नवनीत कौर राणा, अनिल देशमुख यांच्यासह 16 जणांविरुद्ध भादंवि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी 17 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. मात्र, निवडणूक नियंत्रक अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षानं केलेली याचिका कोर्टानं रद्दबातल ठरवत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments