Home ताज्या घडामोडी यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट; धरणी येथील कृषी पर्यवेक्षक निलंबित

यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट; धरणी येथील कृषी पर्यवेक्षक निलंबित

अमरावती 
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकणे धारणीतील एका कृषी पर्यवेक्षकाला चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षकाला निलंबित केले आहे.
अरुणकुमार रोंगे बेठेकर असे निलंबित करण्यात आलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. या प्रकरणात धारणी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.धारणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक पदावर असलेल्या अरुणकुमार रोंगे बेठेकर याने मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तीन दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‌ॅपवर एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टमध्ये ‘बोगस ट्राइब्स’ की समर्थक यशोमती ठाकूर असा उल्लेख केला होता. खऱ्या आदिवासींवर अन्याय करून बोगस लोकांना साथ देणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर यांचा जाहीर निषेध, त्यांची तत्काळ मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता.ठाकूर खऱ्या आदिवासींवर अन्याय करत आहेत. अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्यावर राजकीय दबाव ठाकूर आणत आहेत, असा आरोप या पोस्टच्या माध्यमातून केला गेला. मागील तीन दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करत कृषी पर्यवेक्षक अरुणकुमार रोंगे बेठेकर याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कृषी विभागानेही त्याला निलंबित केले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments