Home Uncategorized अकोला-खांडवा रेल्वेमार्ग मेळघाटाच कायम ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा निर्णय-रेल्वे बोर्ड...

अकोला-खांडवा रेल्वेमार्ग मेळघाटाच कायम ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा निर्णय
-रेल्वे बोर्ड सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांची माहिती

अमरावती

अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे लाईन आता मेळघाटातूनच जाणार असल्याने धारणी-देडतलई भागात आनंदाची लाट पसरलेली आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी धारणी येथे माहिती देतांना पियुष गोयल यांनी आदिवासींच्या सुविधेसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

 
धारणीच्या सीमेवरील मध्यप्रदेशच्या पोटनिवडणुकीतील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी बेटी बचाव अभियानाची माहिती राष्ट्रीय रेल्वेबोर्ड सदस्य तथा भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री राजेंद्र फडके यांनी धारणी येथे आप्पा पाटील यांच्या निवासस्थानी कळमखार येथील कार्यकर्त्यांना दिली. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ब्रॉडगेज रेल्वे लाईन मेळघाटातून घेऊ नये, असे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठविल्यानंतर मेळघाटसह अकोट, अकोला, मध्यप्रदेशातील खंडवा, तुकईथड, इंदौर येथे ब्रॉडगेज लाईन मेळघाटातूनच घेण्यासाठी निवेदने देण्यात आली.

दरम्यान मेळघाटातील वाघांसह इतर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी मेळघाटातून जाणार रेल्वे मार्ग अकोटपासून बुलडाणा जिल्ह्यात वाळवून मेळघाटच्या बाहेरून नेण्याची मागणी वन्यजीव प्रेमी अनेक वर्षांपासून करीत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मेळघाटातून रेल्वे जाण्यास हरकत नोंदविली होती. दुसरीकडे मेळघाटातील राहिवस्यानी मात्र मेळघाटातील रेल्वे मार्ग बंद होऊ नये यासाठी आंदोलन छेडले आहे.
या विषयी मेळघाटच्या धारणी, कळमखार, राणीगाव, धुळघाट व सुसर्दा येथे आदिवासींसोबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली. एकूण परिस्थितीचा विचार करीत तसेच जनतेच्या दबावापुढे आणि आदिवासींच्या समस्यांना लक्षात घेत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जुन्या मीटरगेज मार्गानेच ब्रॉडगेज विस्तारित करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे बोर्ड सदस्य डॉ. फडके यांनी या विषयी सखोल माहिती रेल्वेमंत्री यांना दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला. या शिवाय अमरावतीच्या खा. नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा गोयल यांची भेट घेऊन हा मुद्दा रेटलेला होता. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आप्पा पाटील तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी आणि जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनीही ब्रॉडगेजची मागणी रेटून धरलेली होती.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments