Home ताज्या घडामोडी स्व. दादासाहेब गवई यांच्या संस्थेत गृहकलह; डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला न्यायालयात...

स्व. दादासाहेब गवई यांच्या संस्थेत गृहकलह; डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

अमरावती | बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते स्व. रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या  संस्थेत गृहकलह उफाळून आला आहे. रा.सु. गवई यांचे धाकटे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आईकमलताई गवई यांच्यासह बहीण, जावई आणि दोन भाच्यां विरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

स्व. दादासाहेब गवई यांनी स्थापन केलेल्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सध्या दादासाहेब गवई यांची मुलगी कीर्ती अर्जुन या अध्यक्ष आहेत. या संस्थेचे कोषाक्षपद जावई राजेश अर्जुन यांच्याकडे असून दादासाहेब गवई यांचा नातू धर्म राजेश

अर्जुन हे उपाध्यक्ष आहे तर दुसरा नातू करण राजेश अर्जुन यांच्यासह पत्नी कमलताई गवई धाकटा मुलगा राजेंद्र गवई आणि रूपचंद खंडेलवाल हे सदस्य आहेत. दरम्यान सोमवारी संस्थेचे

सदस्य डॉ. राजेंद्र गवई यांनी या संस्थेत मी आणि रूपचंद खंडेलवाल यांना महत्व दिले जात नाही. मला तर संस्थेत येण्यासही परवानगी राहिलेली नाही असे म्हंटले आहे. ही संस्था डॉ. राजेंद्र गवई यांची असल्याचे लोकांना वाटते. मात्र मी सांगितलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांची साधी ऍडमिशन होत नाही आणि मी सांगितलेल्या उमेदवाराला संस्थेत नौकरीही लागू दिली जात नाही हे वास्तव असुन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आमच्या मुलाला स्वतः च्या संस्थेत प्रवेश देत नाही असे म्हणत लोकांनी माझा पराभव केला असे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.

माझी आई कमलताई गवई यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर माझा भाचा धर्म अर्जुन याला संस्थेचे अध्यक्ष पद मिळाले. त्यावेळेस मला संस्थेचा सचिव करा मला भाच्याच्या हाताखाली काम करायची लाज वाटत नाही असे मी स्पष्ट सांगितले असतानाही मला सचिव पद दिले नाही. आज अर्जुन कुटुंबाची मक्तेदारी आमच्या वडिलांच्या संस्थेवर निर्माण झाली असुन संस्थेत अनेक गैरव्यवहार सुरू आहेत.

मी माझ्यावर झालेला अन्याय सहन केला मात्र आता दर्यापूर येथील आमच्या अभियांत्रिकी महाविद्यावयातील 80 कर्मचाऱ्यांचे वेतन 11 महिन्यांपासून दिले नाही. माझा कर्मचाऱ्यांवर हा अन्याय असून कर्मचाऱ्यांचा संस्थेविरुद्ध असणाऱ्या लढ्यात मी आता सहभागी आहे. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले तर मी आंदोलनात सहभागी होईल आणि कर्मचारी संस्थेविरुद्ध न्यायालयात गेले तर मी न्यायालयात त्यांच्या सोबत असणार असे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments