Home ताज्या घडामोडी यशोमती ठाकूर राजीनामा द्या !

यशोमती ठाकूर राजीनामा द्या !

एकाच दिशेने वाहतूक असणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने आमदारांचे वाहन येते. या मार्गावर तैनात पोलीस शिपाई आमदाराचे वाहन रोखतो. मग आमदार खाली उतरतात आणि त्याला मारतात. वाहनात असणारे आणखी दोघे वाहनाबाहेर येतात आणि वाहतूक पोलिसाच्या थोबाडीत लगवतात. प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोचत. आठ – पंधरा दिवस या घटनेची चर्चा रंगते. आणि झालं गेलं सगळेच सगळं विसरून जातात. 2012 मध्ये आमदार असताना यशोमती ठाकूर यांचा हा किस्सा. खरं तर गाडी चुकीच्या दिशेने आली ती चूकच. ‘भाऊ चुकलं माफ करा.हवा तर दंड वसूल करा.’ इतकं जरी त्यावेळी यशोमती ठाकूर बोलल्या असत्या तर प्रकरण तिथेच संपलं असत. मात्र वाहतूक पोलीस आणि आमदार म्हणून यशोमती ठाकूर यांच्यात नेमका कुठला संवाद झाला आणि प्रकरण कसं चिघळल हे त्या दोघांनाच ठाऊक. मात्र जे घडलं ते चुकीचेच होतं आणि आता जिल्हा सत्र न्यायालयाने त्या वाहतूक पोलिसाच्या बाजूने निर्णय दिला.

खरं तर 2012 मध्ये घडलेल्या प्रकरणचा निकाल 8 वर्षाने लागला.आता न्यायल्याच्या निकालाचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नव्हता. असे असताना ‘यशोमती ठाकूर राजीनामा द्या’ असे म्हणत भाजपने आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरालागत अमरावती शहर आणि जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिवसभर ठिय्या देऊन बसत आहेत. यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावा किव्हा मुख्यमंत्र्यांनी तो मागावा अशी भाजपची मागणी आहे. खरं तर सर्वसामान्य अमरावतीकराला महिला व आरोग्य मंत्री असणाऱ्या याशीमती ठाकूर यांच्याबाबत न्यायाललयाने दिलेल्या निर्णयाचे कुठलेही सोयर-सुतुक नाही आणि भाजपने गत तीन-चार दिवसंपासून सुरू केलेल्या आंदोलनशीही काही घेणे देणे नाही.2012 मध्ये जेव्हा घटना घडली त्यानंतर मोदी लाटेत 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकाही भाजप कार्यकर्त्यास हा विषय आठवला नाही. 2019 च्या निवडणुकीत तर यशोमती ठाकूर यांच्या विरोधात शिवसैनिक असल्याने भाजपला यशोमती ठाकूर यांच्या विरोधात काही आठवण्याचा विषयच नव्हता. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आपल्या हातात काहीच उरलं नाही याची जाणीव झाल्यावर थंडगार पडलेल्या भाजपवल्यानं शहर आणि जिल्ह्यात सुरू असणारे अवैध धंदे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर काही करायला हवं हे कधी सुचलंच नाही आणि ज्या एकेरी मार्गावर यशोमती ठाकूर यांची गाडी घुसली तो मार्ग पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची बदली होताच पुन्हा कसेही वाहन चालविण्यास खुला झाला त्याबाबत काही एक वाटले नाही. आजही शहरात वाहतूक व्यवस्था राम भरोसे असताना याचा पोलीस आयुक्तांना जाब विचारण्याचे धाडस भाजपवाल्यांनी केले नसताना यशोमती ठाकूर राजीनामा द्या हा असला उद्योग का म्हणूम सुचला असेल देव जाणे. स्वतः वकील असणाऱ्या यशोमती ठाकूर यांची या प्रकरणात बाजू कच्ची पडली याचा अर्थ त्यांची चूक ही गंभीर होती हे मान्य करावंच लागेल. खरं तर न्यायालयाच्या निकाल येताच यशोमती ठाकूर यांनी मंत्रीपदाच्या राजीनामा देणार असे जाहीर केले असते तर 2024 च्या निवडणुकीपूर्वीच त्यांच्या तिवसा मतदार संघात भाजपला गारद करण्यास त्या यशस्वी झाल्या असत्या. पण असं काहीही घडले नाही. खरं तर डॉ. सुनील देशमुख, प्रवीण पोटे, आणि डॉ. अनिल बोंडे यांचा पालकमंत्री म्हणून रुबाब अमरावतकरांना चांगलाच ठाऊक आहे. आज हे लोकं कुठे आहेत हे सुद्धा सगळ्यांना माहिती असले तरी उद्या आपणही असेच माजी होऊ याची जाणीव यशोमती ठाकूर यांना असेल किंव्हा नसेल माहिती नाही. दिवाळीपूर्वी यशोमती ठाकूर यांच्या नसवाचे फटाके भाजपवाले मात्र जोरदार फोडत आहेत आता हे फटाके किती फुसके आणि किती खरे एक दोन दिवसात कळेलच.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments