Home ताज्या घडामोडी कमलताई गवई यांनी सोडले 'कृष्णकमल'

कमलताई गवई यांनी सोडले ‘कृष्णकमल’

अमरावती

बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियचे दिवंगत नेते रा.सु. गवई यांच्या संस्थेचे कौटुंबीक कलह त्यांच्या धाकट्या मुलाने चव्हाट्यावर आणताच माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी काँग्रेसनगर परिसरातील ‘कृष्णकमल’ निवस्थान मंगळवारी सोडले आहे. आता त्या त्यांचे महेर असणाऱ्या भानखेडा लगतच्या लुंबिनी मोगरा या गावी वास्तव्यास गेल्या आहे.
दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये रा.सु. गवई यांची मुलगी कीर्ती अर्जुन या अध्यक्ष आहेत तर जावई राजेश अर्जुन कोषाध्यक्ष आहेत. नातू धर्मराज अर्जुन हे उपाध्यक्ष असून लहाना नातू कारण अर्जुनसह कमलताई गवई, धाकटा पुत्र डॉ. राजेंद्र गवई आणि त्यांच्या शेजारी राहणारे रूपचंद खंडेलवाल हे सदस्य आहेत.
दरम्यान डॉ. राजेंद्र गवई यांनी 2 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन आई, बहीण, जावई आणि दोन्ही भाचे माझ्यावर अन्याय करीत असून मला संस्थेत येऊ सुद्धा देत नाहीत असा खळबळजनक आरोप केला होता. संस्थेच्या दारापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 80 कर्मचाऱ्यांना गट 11 महिन्यांपासून वेतन नाही. मी या कर्मचाऱ्यांसोबत असून वेळ पडल्यास संस्थेत पदाधिकारी असणाऱ्या आई, बहीण, जावई आणि भाच्याविरुद्ध न्यायालयात जाणार असा इशारा दिला होता.
डॉ. राजेंद्र गवई यांच्या या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी कमलताई गवई यांनी काँग्रेस नगर येथील ‘कृष्णकमल’ सोडून लुंबिनी मोगरा येथे वास्तव्याला जात असल्याचे पत्रक काढून आता आपण कृष्णकमल हे निवासस्थान सोडले असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments