Home ताज्या घडामोडी बोगस ट्विटरद्वारे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी

बोगस ट्विटरद्वारे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी

मुंबई:

विशिष्ट हॅशटॅगद्वारे बोगस ट्वीटर अकाउंटवरू महाराष्ट्र शासन, मुंबई पोलीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी विशेष मोहीम चालविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. यासाठी ट्वीटरवर सुमारे दीड लाख अकाउंट्स उघडण्यात आली असून भारताप्रमाणेच चीन, नेपाळ, हाँगकाँगमधून लाखो ट्वीटस, रीट्वीट करण्यात आले. विशेष म्हणजे एकाचे वेळी ५०० ट्विट करण्यासाठी बॉट या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यापासून देश पातळीवर राजकारण तापले असतानाच सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात ट्वीट आणि त्यापेक्षा अधिक रीट्वीट केले जाऊ लागले. यामध्ये काही षडयंत्र असल्याचा संशय आल्याने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. या तपासामध्ये आतापर्यंत ट्वीटरवरील तब्बल दीड लाख अकाउंट बनावट असल्याचे उघड झाले आहे. एकावेळी ५०० ट्वीट आणि एका महिन्यात ५ लाख ट्वीट करण्यासाठी किंवा रीट्वीट करण्यासाठी बॉट या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. एखादे विशिष्ट हॅशटॅग टाकून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नकारात्मक किंवा सकारात्मक कमेंट्स अपलोड करता येतात. एका वेळी ५०० ट्वीट केल्यामुळे आतापर्यंत अशा प्रकारचे कोट्यवधी ट्वीट आणि रीट्वीट केले गेले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बॉट या सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशाप्रमाणेच देशातूनही बदनामीकारक ट्वीट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ओळख लपविण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्यात आला आहे. आयपी अॅड्रेसवरून हे ट्वीट कुठून करण्यात आले आणि यामागे कोण आहे याचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. आरोपीला अटक झाल्यास एका मोठ्या कटाचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments