Home ताज्या घडामोडी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचा बिगुल वाजला; 1 डिसेंबरला होणार...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचा बिगुल वाजला; 1 डिसेंबरला होणार मतदान

अमरावती

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचा कार्यकाळ अनेक दिवसांचा संपला असताना सर्वांना प्रतीक्षा असणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे.

भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित आज घोषित केला. त्याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार 5 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र गुरूवार, 12 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, 13 नोव्हेंबर ला करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, 17 नोव्हेंबर रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया 7 डिसेंबर रोजी पुर्ण होणार आहे. या निवडणुकीबाबत आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन संबंधितांनी करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

मतदारांची जिल्हा निहाय संख्या

पुरुष / महिला / इतर / एकूण

अमरावती – 6793 / 3295 / 00 / 10088

अकोला – 4099 / 1901 / 01 / 6000

वाशिम – 3145 / 627 / 00 / 3773

बुलडाणा – 5927 / 1495 / 00 / 7422

यवतमाळ – 5614 / 1793 / 00 / 7507

एकूण – 25578 / 9111 / 01 / 34690

प्रस्तावित मतदान केंद्र जिल्हा मुख्य सहाय्यकारी केंद्र क्रमांक

अमरावती – 25 00 1 ते 25

अकोला – 12 00 26 ते 37

बुलडाणा – 13 01 38 ते 50

वाशिम – 06 01 51 ते 56

यवतमाळ – 19 01 57 ते 75

एकूण – 75 02 77

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments