Home ताज्या घडामोडी मुख्यमंत्री फोन घेत नसल्याने राणा दाम्पत्याने राज्यपालांकडे मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

मुख्यमंत्री फोन घेत नसल्याने राणा दाम्पत्याने राज्यपालांकडे मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

मुंबई

विदर्भ मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी सतत फोन केले. मात्र, मुख्यमंत्री फोन घेत नाहीत. यामुळे राज्यपालांची भेट घेतल्याची तक्रार राणा दाम्पत्याने केली आहे. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न दिल्यास मातोश्री बाहेर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, अशी अपेक्षा खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वीजबिल माफ करण्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राणा दाम्पत्याने चक्क पराटी राज्यपालना भेट स्वरूपात दिली.
मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत विदर्भाचा दौरा केलेला नाही. एकाही खासदाराशी मुख्यमंत्र्यानी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यानी जे पॅकेज घोषित केले त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई देऊ, असे मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे बोलले होते. मात्र, 10 हजार रुपये नुकसान भरपाई त्यांनी दिली आहे. विदर्भात कापसाचे व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री भेटत नसल्याने तसेच फोन उचलत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी मिळाली पाहिजे यासाठी राज्यपालांच्या भेटीला आलो आहोत. शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यपालानी मुख्यमंत्र्यांना कळवाव्या अशी विनंती असे खासदार नवनीत राणा यांनी केली
. दिवाळी आधी नुकसान भरपाई मिळाली नाही तर फक्त ठाकरे कुटूंबियांच्या घरात दिवाळी साजरी होईल आणि शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधारच राहील, असेही राणा दाम्पत्याने राज्यपालांना सांगितले.

मातोश्रीवर करणार आंदोलन

राज्यपालांच्या भेटीदरम्यान विदर्भातील कापूस, सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानाची माहिती राज्यपालांना देण्यात आली. राज्यपाल ही माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही तर, विदर्भातील शेतकऱ्यांना घेऊन मातोश्रीवर आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. जे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत ते शेतकऱ्यांना काय न्याय देणार, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला असून ‘मातोश्री मस्त शेतकरी त्रस्त’ असल्याचा टोला रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments