Home ताज्या घडामोडी उद्यापासून चित्रपटगृह, नाट्यगृह होणार सुरू; 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश

उद्यापासून चित्रपटगृह, नाट्यगृह होणार सुरू; 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश

मुंबई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने चित्रपटांच्या प्रेक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे मार्चपासून बंद असलेली कंटेनमेंट झोनबाहेरीलचित्रपट, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत उद्यापासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर, जलतरण तलाव आणि इनडोअर गेमसाठीही नियमांचे पालन करत सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. रुग्णांची संख्या देशभरात वाढू लागल्याने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. जून महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानुसार राज्य सरकारने मिशन बिगिन अंतर्गत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून टप्प्याटप्याने सर्व व्यवहार सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गेली ८ महिन्यांहून अधिक काळ राज्यातील नाट्यगृह, चित्रपटगृह बंद आहेत. चित्रपटगृह नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह मालकांकडून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी सिनेमागृह मालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रपटगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी केली होती. या संदर्भात एसओपी निश्चित झाल्यावर चित्रपटगृह सुरू करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह,नाट्यगृह सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments