Home Uncategorized मासोळीचा काटा घशात अडकला तर ...

मासोळीचा काटा घशात अडकला तर …

भारतीय आहार शास्त्रांमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक शाकाहारी आणि दुसरे मांसाहारी.भारतामध्ये मांसाहारी पदार्थ हे अतिशय चवीने खाल्ले जातात. मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात आहे.
अनेक लोक मासळीचे सेवन करत असतात. यामध्येच मासळी खाणाऱ्यांचे प्रमाणदेखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. मासळी खाण्याचे खूप मोठे उपयोग देखील आहेत. मात्र, मासळी खाताना खूप मोठी काळजी घ्यावी लागते. मासोळीमध्ये काटे असतात. त्यामुळे मासे खाताना काळजी घेऊनच खावे त्यामुळे आपल्याला हानी पोहोचू शकते.

मासळीमध्ये अमेगा, प्रोटीन, व्हिटॅमिन हे मोठ्या प्रमाणात असते. तसेच मासे सेवनामुळे आपल्या डोळ्यांना देखील मोठा उपयोग होतो. त्यामुळे मासळीचे सेवन नियमितपणे करावे, असे अनेक डॉक्टर सांगत असतात. मात्र मासळी खाताना जर आपल्या घशामध्ये काटे रुतले असतील तर याचा फार मोठा त्रास आपल्याला होतो. आपल्या तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. मात्र, असे असले तरी आपण घशात मासेचे काटे अडकल्यास आपण तातडीने घरगुती उपाय करून यावर मात करू शकता.

1) भाताचा गोळा : जर आपण मासळीचे सेवन करत आहात आणि आपल्या घशामध्ये काटे अडकल्यास आपल्याला फार मोठा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी आपण तातडीने घरगुती उपाय करू शकता.थोडासा भात हातात घ्यावा आणि त्याचा गोळा तयार करावा हा गोळा खावा. यासोबतच घशात अडकलेले काटे हे निघून जातात आणि आपल्याला आराम पडतो. हा प्रयोग दोन तीन वेळेस करावा. यामुळे आपल्याला आराम निश्चित पडतो.

2) केळी : जर मासोळी खाताना आपल्या गळ्यात काटे अडकले असल्यास आपण तातडीने केळीचे सेवन करावे. दोन-तीन केळी खावी. यामुळे आपले काटे निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. हा उपाय आपण करून गळ्यात अडकलेली मासळीचे काटे निश्चितपणे काढू शकतो.

3) कोमट पाण्यात ब्रेड मिसळा : ही प्रक्रिया केळी खाण्यासारखीच आहे. यासाठी ब्रेड घ्या आणि कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळा. ब्रेड वितळल्यावर हे मिश्रण प्या. अशाप्रकारे, ब्रेड आणि दूध किंवा पाण्याचा मऊपणा घशात अडकलेले काटे काढून पोटात घेऊन जातात.

4) जोरदार खोका : माशाचा काटा तुमच्या घशात अडकला आहे असे समजताच प्रथम जोरात खोकायला सुरूवात करा. आपण असे जोऱ्यात खोकल्यामुळे माशांच्या काट्यांना गळ्या खाली जाण्यापासून रोखू शकता. बर्‍याचदा असे घडते की जर आपण काही मिनिटांसाठी खूप खोकतो तर यामुळे घशात अडकलेला काटाच्या विपरीत जोर दिल्याने काटा बाहेर येऊ शकतो.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments