Home Uncategorized किडनी ठेवा नियमित स्वच्च

किडनी ठेवा नियमित स्वच्च

किडनीमध्ये घाण साचल्यास ती योग्य रीत्या काम करत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी किडनी साफ असणे आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील घाण सहजरित्या बाहेर पडू शकेल. किडनी साफ असल्यास किडनी मधील स्टोन, ब्ल’ड प्रेशर, मुतखडा आणि मूत्राशय यांसारख्या आजारांपासून मुक्तता मिळते.


कोथिंबीरीची पाने

एक जुडी कोथिंबिरीची पाने स्वच्छ धुवा आणि ती बारीक चिरून एक लिटर पाण्यात टाका. त्यात थोडा ओवा घाला. कोथिंबीरीची पानं ओवा आणि पाण्याला मंद आचेवर दहा मिनिटे उकळा. हे पाणी थंड झाल्यावर दररोज उपाशीपोटी त्याचे सेवन करा.
आल्याचा चहा

एक मोठा चमचा नैसर्गिक मध, एक छोटा चमचा कुटलेली हळद, आणि एक छोटा चमचा कुटलेले आले. एक पाणी अर्धा कप नारळाचे दूध. पाणी गरम करून त्यात आले आणि हळद घालून दहा मिनिटे उकळा. आणि एक कप दुधामध्ये मध घालून त्यात चहा घाला. ही चहा रोज उपाशीपोटी प्यायल्यास लाभदायक ठरते.
गोखरु, लिंबाची साल आणि वडाची साल – या तीनही गोष्टी २५ ग्राम एकत्र मिसळा व अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळत ठेवा. जेव्हा पाणी उकळून १०० मिलिलिटर वाचेल तेव्हा ते पाणी गाळून घ्या आणि सकाळी व संध्याकाळी उपाशीपोटी ५० मिली घ्या. या काढ्याचे सतत सेवन केल्यास किडनी योग्यरीत्या कार्यरत राहते.
आहार – याव्यतिरिक्त तुमच्या आहारामध्ये टरबूज, लिंबाचा रस ,लाल रंगाच्या बेरी चा रस, भोपळ्याच्या बिया आणि हळद यांचा समावेश करावा. मार्शमेलो रूट, जूनिपर नेटल्स,अजमोद, डैडिलियनचा चहा यांसारख्या आयुर्वेदिक जडीबुटी फायदेशीर ठरतात मात्र या सर्वांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments