Home ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाचे उद्घाटन; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाचे उद्घाटन;
आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती
महाराष्ट्र्रात यावर्षी 5 नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षक आणि पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस असतो, तर बर्डमॅन ऑफ इंडिया डॉ. सलीम अली यांची 12 नोव्हेंबरला जयंती असते. याचे औचित्य साधून या पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या वडाळी येथील बांबू गार्डन परिसरात उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे प्रमुख डॉ. जयंत वडतकर यांच्याहस्ते पक्षी निरीक्षण उपक्रमाचे उद्घाटन झाले.

 भारतीय पक्षीविश्व व पक्षी अभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोचवणारे डॉ. सालिम अली व महाराष्ट्रातील तमाम पक्षीनिरीक्षकांसाठी कायम आदरस्थानी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व मारुती चितमपल्ली या दोन्ही उत्तुंग व्यक्तींचा महाराष्ट्रातील पक्षीविश्वाशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांनी रचलेल्या पायावरच आज महाराष्ट्रातील पक्षिमित्र वाटचाल करीत असतात. योगायोगाने या दोहोंचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ०५ नोव्हेंबर असून पै. डॉ. सालिम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. मारुती चितमपल्ली यांना त्यांचे जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सालिम अली यांना आदरांजली वाहण्यासाठी यावर्षी प्रथमच शासन स्तरावर 5 नोव्हेंबर या आ. मारूती चितमपल्ली यांचे जन्मदिनापासुन ते 12 नोव्हेंबर या पै. डॉ. सालिम अली यांचे जयंती पर्यंत चा आठवडा पक्षीसप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.
याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित झाला असून त्या अनुषंगाने राज्यात वन विभाग आणि पक्षिमित्र यांचे तर्फे पक्षी सप्ताहास मोठ्या उत्साहात आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र व वन विभागाने आज दि. 5 नोवेंबर रोजी या सप्ताहाचे उद्घाटन अमरावती येथे वडाळी बांबू  गार्डन येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी अमरावतीचे उपवनसंरक्षक चंद्रशेकरन बाला, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील, महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक लीना आडे व ज्योती पवार, व गणेश पाटोळे, महाराष्ट्र पक्षिमित्र चे कार्यवाह डॉ. गजानन वाघ, उपजिल्हाधिकारी इब्राहीम चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश भुंबर, वन अधिकारी व कर्मचारी तसेच पक्षिमित्र चे डॉ. श्रीकांत वर्हेकर, किरण मोरे, सौरभ जवंजाळ , अनेक पक्षिमित्र तथा निसर्गप्रेमी यांची उपस्थिती होती.
यावेळी पक्षी साप्ताह बाबत उपवनसंरक्षक चंद्रशेकरन बाला, यादव तरटे पाटील व जयंत वडतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वडाळी तलाव आणि बांबू  गार्डन येथे पक्षी निरीक्षण व नोंदणी कार्यक्रम पार पडला. या मध्ये सुमारे 50 पेक्षा जास्त पक्षी निरीक्षकांनी आपली उपस्थिती दर्शविली. या दरम्यान एकूण 45 प्रजातींचे वेगवेगळे पक्षी नोंदविले गेलेत. पक्षी निरीक्षण सत्रात डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, किरण मोरे, सौरभ जवंजाळ, प्रशांत निकम आदींनी पक्षी विषयक माहिती दिली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर पाळून नागरिक तसेच महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षनाचा आनंद घेतला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments