Home ताज्या घडामोडी मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार; पक्षी संवर्धन आणि पक्षी संशोधन...

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार; पक्षी संवर्धन आणि पक्षी संशोधन पुरस्कारही घोषणा

अमरावती

गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पक्षी संवर्धन आणि पक्षी संशोधन पुरस्कारही घोषीत करण्यात आहेत.

 

राज्यभर आजपासून पक्षी सप्ताह राबविला जात असताना महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्यावतीने यावर्षी पुरस्करप्राप्त व्यक्तींची नावे जाहीर करण्यार आली. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार आचालपूरच्या डॉ. अमोल सुरेश रावणकर आणि अमरावतीच्या किरण मोरे यांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील. सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानपूर्ण पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. जयंत वडतकर यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments