Home ताज्या घडामोडी यशोमती ठाकूर ट्रॅक्टर चालवीत धडकल्या जिल्हाकचेरीवर

यशोमती ठाकूर ट्रॅक्टर चालवीत धडकल्या जिल्हाकचेरीवर

अमरावती

केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी आणि मजुरांवर अन्यायकारक ठरणाऱ्या कायद्याविरोधात जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या स्वतः गुरुवारी इर्विन चौक येथून ट्रॅक्टर चालवीत जिल्हा काचेरीवर धडकल्या.

केंद्र शासनाचे धोरण शेतकरी, कामगारविरोधी
केंद्र शासनाचे धोरण हे पूर्णतः शेतकरी आणि कामगार विराधात आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगले कापडे घालायचे नाही का? त्यांनी शाळेत शिकायचे नाही का? चांगल्या दवाखान्यात शेतकऱ्यांनी जायचे नाही का? असा सवाल महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. कामगार विरोधी कायद्यामुळे आता जे भांडवलदार केंद्र शासनाची जी हुजुरी करताहेत, अशा भांडवलशाहीवाल्यांच्या हातात देश जातो आहे. केंद्र शासनाच्या या अशा धोरणाचा काँग्रेस सातत्याने विरोध करेल, असे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
यावेळी राजपालांना केंदें शासनाला काही समजून सांगावे यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल याना सादर करण्यात आणले. यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, अनिरुद्ध बोबडे आदी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments