Home ताज्या घडामोडी आता लवकरच अध्यक्षपदाची घोषणा - जो बायडन

आता लवकरच अध्यक्षपदाची घोषणा – जो बायडन

वॉशिंग्टन:

‘संपूर्ण मतमोजणी झाल्यावरच आपण अध्यक्षपदी विजयी झाल्याची घोषणा करू. निवडणूक निकालाची दिशा बदलवण्याची क्षमता असलेल्या राज्यांमध्येही आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे आहोत’, असं असं डेमोक्रॅट पक्षाचे जो बायडन यांनी म्हंटले आहे. ताज्या निवडणूक निकालांनुसार बायडन हे व्हाईट हाऊसवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्याच्या जवळ पोहोचले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी मतमोजणी स्थगित करण्याची धमकी दिली होती.

मतमोजणीच्या एका संपूर्ण रात्रीनंतर आपण अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणार हे आता स्पष्ट करू शकतो. अध्यक्षपद जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २७० मतांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी राज्ये जिंकत आहोत. आपण जिंकलो हे घोषित करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. तर संपूर्ण मतमोजणी संपल्यावरच आपण विजयाची घोषणा करू आणि आपल्याला हा विश्वास आहे, असं बायडन यांनी डेलवेअर विलिंग्टनमध्ये सांगितलं.

७७ वर्षीय माजी उपाध्यक्ष बायडन यांनी विस्कॉन्सिनवर २०,००० मतांनी विजय मिळविला. मिशिगनमध्ये आम्ही ३५,००० हून अधिक मतांपेक्षा पुढे आहोत आणि ते वाढत आहे. पेनसिल्व्हेनियाच्या निकाल पाहून खूप बरं वाटतंय. पेनसिल्व्हेनिया येथे मेलद्वारे पाठविलेल्या मतांपैकी सुमारे ७८ टक्के मतं आपल्याला मिळत असल्याचं, बायडन म्हणाले.

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प अजूनही मतमोजणी थांबवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. ‘मोजणी थांबवा’, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. डेमोक्रॅट पक्षाकडून निवडणुकीत घोळ केला आहे. विस्कॉन्सिनमध्ये फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. तर पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जियामध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments