Home Uncategorized प्रभास तिचा फॅन अन ती प्रभासची आई !

प्रभास तिचा फॅन अन ती प्रभासची आई !

‘बाहुबली‘ अर्थात अभिनेता प्रभासचे लाखो चाहते असले, तरी खुद्द तो मात्र नव्वदीच्या दशकातील एका अभिनेत्रीचा मोठा चाहता आहे.
विशेष म्हणजे आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर तो आगामी ‘
राधे श्याम’ या चित्रपटात काम करणार आहे. ही अभिनेत्री आहे भाग्यश्री. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमानबरोबर सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या भाग्यश्रीचे तेव्हा खूप फॅन्स होते. त्यात स्वत: प्रभासही होता. या अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. परंतु मधल्या काळात ती सिनेसृष्टीपासून दूर गेली होती.
”मैंने प्यार किया’ हा चित्रपट बघूनच मी भाग्यश्री यांच्यावर फिदा झालो होतो. ‘राधे श्याम’ या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय याचा मला आनंद वाटतोय’, असं प्रभासनं सांगितलं आहे. या चित्रपटात भाग्यश्री प्रभासच्या आईची भूमिका साकारत असल्याचं समजतं. प्रभास पक्का खवय्या आहे. तो सेटवर विविध प्रकारचे चमचमीत खाद्यपदार्थ आणतो आणि भाग्यश्रीलासुद्धा ते आग्रहानं खाऊ घालत असतो. जीचा मी खूप मोठा फॅन आहे. जिला। भेटायला मी लहानपणापासून उत्सुक होतो आज ती माझी आई आहे असे प्रभास मोठया आनंदाने सांगतो.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments