Home Uncategorized मराठी रंगभूमी अन नाट्यप्रवास

मराठी रंगभूमी अन नाट्यप्रवास

विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ ला सांगली येथून सुरु केलेला हा नाट्यप्रवास आजतागत तसाच अविरत पणे सुरु आहे. महाराष्ट्रात हि नाट्यदिंडी पुढे सरकत असतांना अनेक कलावंत या दिंडीतील प्रवासी झालेत. प्रत्येकाने आपल्या कष्टाने, मेहनतीने या रंगभूमीला आपले योगदान दिले. आपली सांस्कृतिक चळवळ अशाच अनेक कलावंतांमुळे पुढे जात आहे. परंतु नवीन दमाच्या प्रत्येक कलावंतांना पुढे जात असतांना आपल्या गावातील आपल्या जिल्यातील आपल्या शहराचा सांस्कृतिक इतिहास माहित नाही. त्याची माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती अमरावतीमधील युवा रंगकर्मी विशाल रमेश तराळ यांनी केली.

 

” मराठी रंगभूमी दिन ” आपल्या आयुष्यातील कित्तेक वर्ष रंगभूमीला प्रामाणिक पणे अर्पण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि नवीन दमाचे नवं काहीतरी करू पाहणारे तरुण कलावंत यांच्यात चर्चा घडवून आणणे हा पहिला उद्देश व ज्या रंगकर्मी नी आपले योगदान रंगभूमी सक्षम करण्याकरिता दिले. त्यांना “ कृतज्ञता पुरस्काराने ”सन्मानित करणे हा दुसरा उद्देश. अशी या कार्यक्रमाची रूपरेषा.
तीन वर्षापासून सुरु असलेला हा कार्यक्रम , या वर्षी सुद्धा मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला. दीपप्रज्वलन, नटराज पूजन, संहिता पूजन, तसेच रंगमंचावर वापरण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक गोष्टींचे पूजन आदरणीय कलावंत अजित वडवेकर व संजीवनी पुरोहित यांनी केले. त्यानंतर नवीन दमाच्या कु. अंजली टाले, विष्णू आवंडे व अनुराग वानखडे या तरुण कलावंतांनी त्यांनी साकारलेल्या नाटकातील प्रसंग साकारून त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. युवा कलावंत व ज्येष्ठ कलावंत अजित वडवेकर, संजीवनी पुरोहित यांच्यातील चर्चेने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने अमरावतीतील नामवंत कलावंत नाना उर्फ माणिक देशमुख, गजानन संगेकर, भूषण उंबरकर हे उपस्थित होते.

कोरोना काळात व्यवसाय ठप्प झालेल्या आदरणीय लतीफ शेख सर्वांचे लाडके मामू यांना सुद्धा अद्वैत ने राबवलेल्या ” आपला जिल्हा – आपला कलावंत – आपली मदत ” उपक्रमाअंतर्गत मदतीचा हात म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांना आर्थिक मदत कलावंतांनी केली. तसेच सत्कारमूर्ती यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता अभिजित देशमुख, विष्णू आवंडे व अनुराग वानखडे यांनी अजित वडवेकर यांना ” कृतज्ञता पुरस्काराने * सन्मानित केले. तर दिपाली बाभूळकर, आकांक्षा असनारे व अंजली टाले यांनी सौ. संजीवनी पुरोहित यांना “ कृतज्ञता पुरस्काराने ” सन्मानित केले.

“मराठी रंगभूमी दिन कृतज्ञता पुरस्कार सोहळा व चर्चासत्र” या त्रिवेणी कार्यक्रमाकरिता अनुराग वानखडे, विष्णू आवंडे, अंजली टाले, स्वेहा तराळ, मनीष प्रजापती, स्वाती तराळ व विशाल रमेश तराळ यांनी आपले योगदान दिले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments