Home Uncategorized पांढऱ्या केसांना काळा लूक

पांढऱ्या केसांना काळा लूक

आपले केस काळेशार आणि लांबसडक असावेत, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण काही जण लहान वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करतात. बऱ्याचदा केस पांढरे होण्यामागील नेमकी कारणं लक्षात येणे आपल्याला कठीण जाते. अशा परिस्थितीत पांढवाढत्या वयानुसार आपले केस पांढरे होऊ लागतात. वास्तविक केस पांढरे होण्यामागील कारण म्हणजे शरीरामध्ये मेलॅनिन रंगद्रव्याची कमतरता. शरीरात असणाऱ्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर आपल्या केसांचा आणि त्वचेचा नैसर्गिक रंग अवलंबून असतो. जेव्हा शरीरात मेलॅनिनची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस केस पांढरे होऊ लागतात.

 

वृद्धत्वामुळे शरीरामध्ये मेलॅनिनची पातळी कमी होणे स्वाभाविक आहे. पण याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळेही या रंगद्रव्याची पातळी घटू शकते. जर तुमचे केस अनुवांशिक कारणांमुळे पांढरे झाले असल्यास ते नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत. पण शरीरातील पोषक घटकांच्या अभावामुळे केस पांढरे झाले असतील तर आहारामध्ये योग्य ते बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. त्यासाठी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

(Hair Care Tips या ६ कारणांमुळे सुरू होते केसगळती; दुर्लक्ष करू नका, लवकरच करा योग्य उपाय)
​अनुवांशिक कारणांमुळे केस पांढरे झाल्यास काय करावे?आपल्या केसांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरातील मेलॅनिनचा स्तर कमी होऊ लागतो. तसंच केस पांढरे होणे ही समस्या व्यक्तीच्या जीवनशैलीमुळेही उद्भवू शकते. तसंच जर तुमच्या आई वडिलांनीही लहान वयातच केस पांढरे होण्याच्या

समस्येचा सामना केला असेल तर तुमचेही केस कमी वयातच पांढरे होऊ शकतात. अनुवांशिक कारणांमुळे पांढरे होणारे केस नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत.केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२, फॉलेट, कॉपर आणि लोह यासारख्या पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. नियमित पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केसांना पुन्हा नैसर्गिक रंग मिळू शकतो.

(Natural Hair Care कोंडा व कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी वापरा चण्याचे हेअर पॅक, पाहा आश्चर्यकारक बदल)थायरॉइड किंवा अ‍ॅलोपेसिया अ‍ॅरिएटा यासह आरोग्याच्या अन्य समस्यांमुळेही केस पांढरे होऊ शकतात. याव्यतिरिक्त शरीरातील हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यासही केसांचा रंग बदलतो. शारीरिक आजारांवर योग्य वेळेतच औषधोपचार करणं आवश्यक आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments