Home ताज्या घडामोडी कोरोनाची दुसरी लाट येणार ! खबरदारी घेण्याची गरज

कोरोनाची दुसरी लाट येणार ! खबरदारी घेण्याची गरज

मुंबई

मुंबई आणि राज्यात सध्या कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज येथे सांगितले.

आकडेवारी दिलासादायक

कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यावेळी उपस्थित होते.मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वी राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदुषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments