Home ताज्या घडामोडी जो बायडन जिंकले

जो बायडन जिंकले

वॉशिंग्टन

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे जिंकले आहेत. जो बायडन आता अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांनी पराभव केला आहे. बायडन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी इलेक्टोरल मते मिळाली.

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांनी निवड होणार आहेत. आफ्रो-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. मतमोजणीच्या मुद्यावरून ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेतील सत्ता संघर्षाचा पुढील अंक कोर्टात रंगण्याची चिन्हं आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरस कायम होती. स्विंग स्टेटमध्ये बायडन यांना दमदार कामगिरी करताना ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला. अखेरच्या टप्प्यात जॉर्जिया, पेन्सिलवेनिया, नॉर्थ कॅरिलोना आणि नेवादा या राज्यांच्या हाती सत्तेची चावी होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बायडन नेवादात आघाडीवर होते. तर, ट्रम्प इतर तीन राज्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र, मतमोजणी वाढू लागल्यानंतर अखेरच्या टप्प्यात बायडन यांनी मारली. डेमोक्रॅटीक पक्षाने तब्बल २८ वर्षांनी जॉर्जिय आपल्याकडे खेचून आणले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments