Home ताज्या घडामोडी पतीला मारला चाकू, पत्नीकडून हिसकले दागिने; माधव नगर परिसरात चोरट्यांचा थरार

पतीला मारला चाकू, पत्नीकडून हिसकले दागिने; माधव नगर परिसरात चोरट्यांचा थरार

अमरावती 

शरातील माधवनगर येथे राहणाऱ्या एका घरात शनिवारी रात्री झाली. चोरांनी पतीला चाकूमारून चोरट्यांनी पतींजवळून ३ लाख ९२ हजार रुपयांचे दागिने व ४ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९६ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. चोरी करून जाताना चोरट्यांनी हवेत गोळीबारही केल्याने खळबळ उडाली.

माधव नगरमध्ये राहणाऱ्या प्रदीप माथने यांच्या घरी शनिवारी रात्री दोन चोरटे शिरले. त्यांनी प्रदीप मथाने पत्नी शुभांगी माथने यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सर्व दागिने लुटले. याच दरम्यान प्रदीप माथने हे घरी आले. त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्यांनी त्यांना चाकू मारून जखमी केले. चोरीचा हा थरार पंधरा मिनिटे सुरू होता. त्यानंतर परिसरातील मुख्य चौकात येऊन चोरट्यांनी हवेत गोळीबार केला व रस्त्याने येणाऱ्या नंदू वामनराव कुटे या दुचाकीस्वाराला दगड मारून जखमी केले. त्यानंतर कुटे यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी घटनास्थळला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments