Home ताज्या घडामोडी पक्षी सप्ताह : छत्री तलाव परिसर ते बंदरझिरा येथे पक्षी निरीक्षण

पक्षी सप्ताह : छत्री तलाव परिसर ते बंदरझिरा येथे पक्षी निरीक्षण

अमरावती
पक्षी सप्ताहाच्या चौथ्या दिवशी वडाळी वनपरिक्षेत्र, वनविभाग अमरावती आणि
महाराष्ट्र पक्षीमित्र, वन्यजीव पर्यावरण सवर्धन संस्था (वेक्स) अमरावती या संस्थेच्या सहकार्याने छत्री तलाव परिसर ते बंदरझिरा पर्यन्त नेचर ट्रेक व पक्षीनिरीक्ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आयोजन करण्यात आले.
पक्षी निरीक्षणासाठी जंगल भ्रमंती दरम्यान विद्यार्थी, निसर्गप्रेमी नागरीक, वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेऊन विविध पक्ष्यांची ओळख पटवून घेतली. यावेळी पोहरा मालखेड जंगलातील एकूण ५३ पक्षी प्रजातींची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे स्थानीक स्थलांतरीत व अतीशय दुर्मिळ असलेला ब्लॅक ईगल या शिकारी पक्ष्यांची जोडी या ठिकाणी सर्वांना बघता आला.

सहायक वनसंरक्षक लिना आदे व वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश भुंबर यांचे मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी शाम देशमुख, प्रफुल्ल फरतोडे, सि. बी. चोले, जी. के. मस्से, ओंकार भुरे, राजेंद्र कठाळे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमातील सहभागी व्हा पक्षीनिरीक्षक शशांक नगराळे, सुमित अंबुलकर, प्रशांत तिरमारे, सौरभ जवंजाळ, सतेज केचे, अमित सोनटक्के, प्रशांत निकम, आनंद माहुरे, संकेत राजुरकर, वेक्स चे किरण मोरे व महाराष्ट्र पक्षिमित्र चे अध्यक्ष डॉ जयंत वडतकर यांनी मार्गदर्शन केले व सर्व पक्ष्यांची माहीती दिली. नोंदवीलेल्या पक्ष्यांची नोंद ई-बर्ड या जागतीक संकेस्थळावर करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments