Home ताज्या घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अध्यक्षपदासोबतच जाणार मलेनिया !

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अध्यक्षपदासोबतच जाणार मलेनिया !

वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रध्यक्ष पदासोबतच ट्रम्प यांच्या यांना पत्नी अलेनिया सोडचिट्ठी देऊन जाणार असल्याचे वृत्त आहे.

जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर बसण्याच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरलं गेलं. पण, याचबरोबर आणखी एक कौटुंबिक धक्का बसण्याची शक्यता आहे. डेल मेल या वृत्तपत्रानं डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त दिलं आहे. मलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. मेलेनिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये घटस्फोट आणि लग्नासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. यात मेलेनियानं मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे.

52 वर्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचे 28 वर्षाच्या मलेनिया सोबत झाले होते लग्न

1998 मध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प
यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं होतं. त्यावेळी ट्रम्प यांचं वय 52 होत तर मेलेनिया याचं वय 28 होतं. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरु होता त्यानंतर टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर 2004 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 1.5 मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलेनियाला देत लग्नाची मागणी केली होती. 22 जानेवारी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments