Home ताज्या घडामोडी चांदूर रेल्वेतील विद्यामंदिरात 'बालसप्ताह’; दीपोत्सवाच्या महुर्तावर शाळांही होणार ‘सज्ज’

चांदूर रेल्वेतील विद्यामंदिरात ‘बालसप्ताह’; दीपोत्सवाच्या महुर्तावर शाळांही होणार ‘सज्ज’

अमरावती

श्रीनाथ वानखडे

दिवाळीच्या साडेतीन मुहूर्तावर सर्वांचे घर व प्रतिष्ठाने सर्वांगसुंदर होत आहे त्याच धर्तीवर विद्यादानाचे पवित्र स्थान असलेली शाळासुद्धा स्वच्छ असावे याकरिता चांदुर रेल्वे शिक्षण  विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘बालसप्ताह व दीपावली च्या मुहूर्तावर या आठवड्यात जिल्ह्यातील चांदुर रेल्वेतील शाळांमध्ये दिवाळी चा उत्साह बघायला मिळणार आहे.

[गत वर्षी राजुरा केंद्रावरील दीपोत्सवाचा फोटो]

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून प्रत्येक व्यक्ती आपले घरांची व प्रतिष्ठाणची रंगरंगोटी करत आहे.दिवाळीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असतांना मग ‘विद्यामंदिर’परिसर सुद्धा अस्वच्छ असू नये. तिथे सुद्धा हा उत्साह कायम रहावा या उद्देशाने ‘दीपोत्सव ‘ हा उपक्रम हाती घेतलेला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांना आकाशदिव्यांची निर्मिती ,शालेय परिसर स्वच्छ असणे,बालकसप्ताह निमित्याने मुलांना विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहित करणे सोबतच दिवाळी या सणात गरजू मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर फराळ,व भेटवस्तू देणे,दिवाळीदरम्यान  स्थानिक शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या ताईच्या सहकार्यातून शालेय प्रवेशद्वारावर दिवे लावणे आदीं उपक्रमांचा  समावेश राहणार आहे.यापूर्वीही तालुक्यातील राजुरा केंद्रात गत तीन चार वर्षापासून ‘दीपोत्सव’हा उपक्रम सुरु आहे.

बालसप्ताहातील दीपोत्सव

संपूर्ण राज्यात दिनांक 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित ऑनलाईन स्वरुपात बालकदिन सप्ताह साजरा केला  जाणार असून नुकतीच तालुक्यातील सर्व शाळांतील सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षकांची ऑनलाईन बैठक घेवून त्यातील उपक्रमांची माहिती देण्यात आली.याच सप्ताहात दिवाळी असल्याने आम्ही दीपोत्सव साजरा करणार आहोत.अगोदर गटसाधन केंद्राची साफसफाई करून तिथेही दिवाळी च्या दिवशी दीप प्रज्वलित राहणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर यांनी सांगितले.

बालसप्ताहातील वेळापत्रक

दिनांक       वर्गगट           स्पर्धा

8 – इयत्ता 1ली व 2 री        भाषण
9 इयत्ता  3 री ते 5 वी        पत्रलेखन
10 इयत्ता 6 ते 8 वी          स्व लिखित कविता वाचन
11 इयत्ता 6 ते 8 वी          नाट्यछटा (एकपात्री)
12 इयत्ता 9 व 10 वी        पोस्टर स्पर्धा
12 इयत्ता 11 व 12 वी      निबंध लेखन
13 इयत्ता 9 व 10 वी-      निबंध लेखन
13 इयत्ता 11 व 12 वी      व्हिडीओ निर्मिती
14 इयत्ता1 ली 12 वी-      बाल साहित्य ई संमेलन

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments