Home Uncategorized महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर वाळूचीतस्करी; पोलिसांनी जप्त केले 35 डंपर

महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर वाळूची
तस्करी; पोलिसांनी जप्त केले 35 डंपर

अमरावती
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर वाळूची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर येताच वरुड आणि शेंदूरजना घाट पोलिसांनी धडक मोहीम राबवून केलेल्या कारवाईत अवैध रेती वाहून नेणारे 35 डंपर पोलिसांनी जप्त केले. या कारावीमुळे चिडलेले वाळू तस्कर पोलिसांशी अररेरावी करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घसण्याचा प्रयत्न करतात पाच चारचाकी वाहन रस्त्यावर सोडून त्यांनी पळ काढला. गत आठ दिवसांपासून वाळू तस्करांविरोधात महसूल प्रशासन कारवाई करीत असताना रविवारी पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत वाहणाऱ्या कन्हान नदीतून रेतीचा उपसा हा रात्रंदिवस सुरू असून या भागातून मध्यप्रदेशातील पांडूर्णा आणि महाराष्ट्र्रातील वरुड, मोर्शी, नागपूर, अमरावती, अकोला पर्यंत या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू नेली जाते. महसूल विभागाने अवैध वाळू तस्करीविरोधात अनेकदा कारवाई केली असली तरी पोलिसांनी एकाचवेळी 20 कोटी रुपये किंमत असणारे 35 डंपर आणि वाळू जप्त केल्याने वाळू माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
कन्हान नदीतून रेतीचा अवैध उपसा करून 24 तसात 500 चया जवळ डंपर आणि ट्रक द्वारे रेतीची तस्करी सुरू असते. पहाटेच्या वेळी आणि रात्री सर्वाधिक प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनात आम्ही सापळा रचून 35 ट्रक जप्त केले. या ट्रकला रस्त्याने कुठलाही धोका संभवतो का की नाही याची माहिती घेण्यासाठी ट्रकच्या समोर वाळूमाफिया कारने या मार्गावर असतात. ही कारवाई केल्यावर वाळू माफिया पॉकेसांशी हुज्ज घालण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी 5 कार रस्त्यावर सोडून पळ काढला. या सगळ्या वाळू माफियांवर कारवाई केली जाणार असल्याचे वरूडचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments