Home ताज्या घडामोडी दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी उडविले ; विद्यापीठाच्या कामासाठी अकोल्यावरून आली होती अमरावतीला

दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी उडविले ; विद्यापीठाच्या कामासाठी अकोल्यावरून आली होती अमरावतीला

अमरावती

अकोला येथील महिला मंगळवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कामानिमित्त आली असता तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी उडविले. दुपारी अडीच वाजताचे सुमारास मध्यवर्ती बसस्थानक ते बियाणी शिवटेकडी मार्गावर ही घटना घडली.घडली.
संगीता टावरी (अकोला) असे मंगळसूत्र चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे. संगीता टावरी या मंगळवारी अमरावती येथे आल्या होत्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील काम आटोपून त्या पायी मध्यवर्ती बसस्थानक येथे होत्या. यावेळी शिवटेकडी मार्गाने जात असलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र पळविले. संगीता टावरी यांनी आरडाओरड केली. मात्र दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरटे पसार झाले.
दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र उडविल्यावर संगीता टावरी या ऑटो चालकाच्या मदतीने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार पुंडलिक मेश्राम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मेश्राम व त्यांच्या पथकांनी परिसरातील नागरिकांना घटनेबाबत विचारपूस केली.
दरम्यान, घटनास्थळ कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments