Home ताज्या घडामोडी मत मोजणी सुरूच;बिहार निवडणुकीत चुरस

मत मोजणी सुरूच;बिहार निवडणुकीत चुरस

पाटणा

बिहार निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली.आता ही मतमोजणी रात्री उशिरापर्यंत होणार असून निवडणूक चुरशीच्या वळणावर आल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांचे निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ३ कोटी मतांची मोजणी झाली होती. मतमोजणी दिवसभर आघाडीवर असलेली एनडीए संध्याकाळनंतर काहीशी मागे पडली आहे. आता बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडी ( महागठबंधन ) एनडीएमध्ये आता बोटावर मोजण्याइतक्या जागांचा फरक आहे. यामुळे बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३ जागांवर २०० मतांचा फरक, ९ जागांवर ५०० मतांचा फरक, १७ जागांवर १००० मतांचा फरक, ३३ जागांवर २० हजार मतांचा फरक, ४८ जागांवर ३००० मतांचा फरक आणि ६८ जागांवर ५००० मतांचा फरक होता.

करोना संकटामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बिहारमध्ये निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीदरम्यान करोना व्हायरस संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. यामुळे कुठल्याही घाईघाईत कुठलाही निकाल जाहीर करू नका. आवश्यक तेवढ्या वेळातच मतमोजणी पूर्ण करा, असे आदेश निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. करोनामुळे मतमोजणीच्या नियमांमध्ये बदल झाल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालेल, असं आयोगाने म्हटलं आहे.
बिहारमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतमोजणीच्या ४८५८ फेऱ्या झाल्या आहेत. मोतमोजणीच्या एकूण ७७३७ फेऱ्या होणार आहेत. आतापर्यंत ११९ मतदारसंघांमधील मतमोजणी निम्म्यावर आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त आशिष कुंद्रा यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments