Home Architecture गुणकारी गूळ

गुणकारी गूळ

रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन का करावे? आरोग्यदायी लाभ माहीत आहेत का, जाणून घ्यागुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्यास घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.

प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारख्या कित्येक पोषक घटकांचा गुळामध्ये खजिना आहे. विशेष म्हणजे यामध्ये फॅट्स अजिबात नाहीत. यामुळे फिट राहण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देखील देतात. सविस्तर जाणून घेऊया गूळ खाण्याचे फायदे…हिवाळ्याच्या दिवसांत आजार दूर ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये आढळणारी पोषण तत्त्वे संसर्गाविरूद्ध लढण्याचे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करतात.

 

 

फिटनेसाठी : गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. तसंच चयापचयाची क्षमता वाढण्यासही मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुळाचे सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त पाणी जमा होण्याची समस्याही दूर होण्यास मदत मिळेल.

​बद्धकोष्ठतेची समस्या

पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्त्वांचा गुळामध्ये साठा आहे. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. विशेषतः बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसंच यातील पोषक घटक डाययुरेटिक स्वरुपातही कार्य करतात आणि शरीरामध्ये मल अथवा विषारी पदार्थ जमा होऊ देत नाहीत. जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्याचं नियमित सेवन केल्यास आपल्या पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मांमुळे अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होते.

 

शरीरास आवश्यक असणारे अनेक प्रकारचे पोषक घटक गुळामध्ये आढळतात. मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच गुळातील पोषण तत्त्वांमुळे आपला मूड देखील चांगला राहतो. गुळाच्या सेवनामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करणं लाभदायक असते.

(Health Care Tips मधुमेहींनी उत्सवांमध्ये केवळ मिठाईच नव्हे तर ‘या’ गोष्टींपासूनही राहावे दूर)
​यकृत राहते निरोगी

गुळातील पोषण तत्त्व आपले शरीर नैसर्गिक स्वरुपात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यातील औषधी गुणधर्म यकृत स्वच्छ ठेवण्यासह शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करतात. सोबतच यकृत डिटॉक्सिफाय देखील करतात. यामुळे यकृतावरील अतिरिक्त ताण कमी होतो. ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते.

गुळात लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे गूळ. शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्त पेशींची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. तसंच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. गुळाच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन वाढते. गर्भवती महिलांनीही गुळाचे सेवन करणं लाभदायक ठरते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीरातील थकवा दूर होतो.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments