Home ताज्या घडामोडी बिहार : एनडीएला स्पष्ट बहुमत ; नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री

बिहार : एनडीएला स्पष्ट बहुमत ; नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री

पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. निवडणुकीत एनडीएने जागा जिंकल्या. तर आरजेडी आणि काँग्रेस आघाडीला जागा मिळाल्याने सत्तांतर घडवण्यात अपयश आलं. या निवडणुकीतील विजयामुळे नितीशकुमार सातव्यांदामुख्यमंत्री होतील.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज पहाटे ३ वाजता लागला. विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीएने (भाजप-जेडीयू) या निवडणुकीत १२२ जागांचा बहुमताचा जादूई आकडा पार केला असून ३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडीला (आरजेडी – काँग्रेस ) निवडणुकीत ११० जागा जिंकता आल्या. यामुळे बिहारमधील सत्तांतराचं काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचं स्वप्न भंगलं आहे. पण भाजपच्या तोडीसतोड जागा मिळवत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना सत्ता मिळाली नसली तरी त्यांचा हा विजयच मानला जातोय.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आयोगाने काही नियम बदलले होते. यामुळे मतमोजणीत उशीर झाला. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास निवडणुकीचे निकाल हाती आले आणि बिहारमधील एकूण चित्र स्पष्ट झालं.

एनडीएने जिंकलेल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपने ७२ जागा तर जेडीयूला ४२ जागा जिंकता आल्या. व्हीआयपी आणि एचएएमचा प्रत्येकी ४ जागांवर विजय झाला. अशा मिळून एनडीएने १२२ जागा जिंकल्या. तर ३ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागांपैकी आरजेडीने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या. काँग्रेसने १९ आणि १६ जागा डाव्या पक्षांनी जिंकल्या. महाआघाडीने एकूण ११० जिंकल्याने बहुमत मिळवता आलं नाही. तर एमआयएमने ५ जागा जिंकल्या. तर बसपा, एलजेपी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी १ जागा जिंकली. निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सर्वाधिक ७५ जागा मिळवून सर्वात मोठ पक्ष ठरला आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments