Home Uncategorized तेजस्वी

तेजस्वी

सकाळपासुन श्वास रोखुन धरणारा बिहार निवडणुकीचा सामना कमी फरकाने तेजस्वी यादव यांच्या हातातुन निसटला.दुर्दैव.एवढंच या पराभवाच वर्णन तेजस्वी समर्थक करतील मात्र तेजस्वी यादव ह्यांनी ज्या पद्धतीने हि निवडणूक लढवली ते खरोखरच अभिनंदनीय.तेजस्वी यादव एकीकडून धुवांधार फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजुला असलेली काँग्रेस मात्र तेजस्वी यांना योग्य ती साथ देऊ शकली नाही म्हणुन महागठबंधनला पराभव स्वीकारावा लागला.महाराष्ट्रात मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लढाईच्या अगोदरच आपले शस्त्र टाकले होते.राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणुकीत आपला करिश्मा आणि जिगर दाखविला त्यामानाने काँग्रेस लढली नाही,अन्यथा परिणाम वेगळे असते.जी परिस्थिती महाराष्ट्रात घडली तिचा दुसरा भाग बिहार मध्ये पार पडला.

 

तेजस्वी यादव यांच्या राजदला काँग्रेस आपल्या अंतर्गत गटबाजीमुळे निर्णायक साथ देऊ शकली नाही.म्हणुन हा निसटता पराभव नशिबी आला.याठिकाणी खरा फायदा भाजपला झाला.भाजप बिहारमध्ये जदयु पेक्षा मोठा पक्ष म्हणुन उदयास आला,जी स्थिती महाराष्ट्रात सेनेची झाली तीच परिस्थिती आता नितीश यांची झाली.जनता दल(युनायटेड) पन्नास जागा सुद्धा जिंकु शकली नाही हा नितीश कुमार यांना खुप मोठा दणका आहे,मागील पाच वर्षात नितीशकुमार यांनी बदलविलेल्या राजकीय भूमिका मतदारांना फारश्या रुचल्या नाहीत,सुरुवातीला मोदी विरोध म्हणुन राजद सोबत युती आणि काही काळातच भाजपचा हात धरला,हि कृती जनता दल युनायटेडला खुप महागडी पडल्याचे दिसली.चिराग पासवान यांच्या लोजपाने त्याचबरोबर एम आय एमने देखील भाजपची अप्रत्यक्ष साथ दिली.या दोन पक्षाच्या उमेदवारानी धर्मनिरपेक्ष मताचे ध्रुवीकरण केल्याने जवळपास पंचवीस ते तीस जागा महागठबंधनच्या हातुन गेल्या.

 

 

बिहारचा निकाल काहीही लागला तरी या निवडणुकीत खरा नायक तेजस्वी यादव ठरला.तिशीतील या तरुणाने आपल्या स्वबळावर #बिहारफर्स्टबिहारी_फर्स्ट* या स्लोगनद्वारे बिहारी जनतेच्या मनात घर केलं.तरुणाई तेजस्वी यांच्या हाकेला ओ देत होती हा सकारात्मक संदेश आहे.तेजस्वी यादव पुढील काळात बिहारचे उज्वल नेतृत्व आहे हे सिद्ध झाले.वडील कारागृहात समोर पंतप्रधान मोदीजी,मुख्यमंत्री नितीशकुमार सारखे अनुभवी नेते त्यांच्या दिमतीला सारं केंद्रीय मंत्रिमंडळ तरी देखील हा गडी एकटा लढला.दुर्दैवाने लक्षाजवळ पोहचून सुद्धा विजयाने हुलकावणी दिली.हा भाग अलाहिदा.तेजस्वी यादव हे उत्तम क्रिकेटपटू आहे.त्यामुळे ते हा पराभव खिळाडूंवृत्तीने स्वीकारतील आणि पुन्हा नव्या दम्याने बिहारी जनतेच्या सेवेला लागतील.

बिहार जरी भाजप-जदयु जिंकलं.तेजस्वी हरले तरी त्यांच्या जिगरबाज वृत्तीला सलाम. याठिकाणी एका हिंदी चित्रपटातील वाक्य आठवलं ते म्हणजे #हारकरजितनेवालोकोबाजीगरकहतेहै* बिहारच्या निवडणूकीचे खरे बाजीगर तेजस्वी यादव ठरले आहे.आणि सर्व तरुण नेत्यांसाठी ते एक उत्तम उदाहरण म्हणून समोर आले.
                                                                                                           अमोल इंगळे,
                                                                                                           ९६७३९५०८०८

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments