Home ताज्या घडामोडी कोरोना उपाय योजनेत महाराष्ट्र 'बेस्ट'; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले कौतुक

कोरोना उपाय योजनेत महाराष्ट्र ‘बेस्ट’; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई

देशातील विविध राज्यांनी केलेल्या करोना उपाययोजनांचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी करोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणूस केंद्रीत ठेवून जे नाकविन्यपूर्ण निर्णय घेतले ते बेस्ट होते आशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र चे कौतुक केले.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा कोरोना समदर्भात आढावा घेतला. बैठकील महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. करोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्राने घेतले आहेत.
हे निर्णय अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत करोनाविषयक तपासणी व जनजागृती करता आल्याने त्याचा प्रभावी परिणाम दिसून येत असल्याची माहिती टोपे यांनी बैठकीत दिली. दिवाळी सण, हिवाळा यापार्श्वभूमीवर शासन घेत असलेल्या खबरदारी विषयीही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील करोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारीही घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments