Home ताज्या घडामोडी माझी वसुंधरा अभियान आणि सायकल शो !

माझी वसुंधरा अभियान आणि सायकल शो !

सायकल चालविणे हा खरच उत्तम व्यायाम आणि प्रदूषणमुक्त संचाराचे उत्कृष्ट साधन. आता सायकल चालविण्याचे महत्व फार वाढले आहे. सायकलचालविणाऱ्यांचे अनेक ग्रुप अमरावती शहरात निर्माण झाले आहे. आणि खरं तर सायकल ही काळाजी गरजही आहे. माझी वसुंधरा अभियायन हे 2 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत राबविले जात आहे. खरं तर शहराचे प्रथम नागरिक, महापालिका आयुक्त आणि एकूणच महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक बुधवारी सायकल चालवतच महापालिकेत आले.हे कौतुकास्पदच आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत दर बुधवारी आता सगळ्यांनी सायकलनेच महापालिकेत यायचं असा आदेशच निघाला. या आदेशामुळे महापालिकेचा आवार बुधवारी सायकलमय झाला. मात्र दुर्दैवाने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शेकडो दुचाक्या दिवसभर खच्चून उभ्या राहिल्या. राजकमल चौकाकडून ते जयस्तंभकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीचा चांगलाच बट्ट्याबोळ झाला. ऐन दिवाळीच्या धामधुमीत अचानक सायकलीच्या माध्यमातून उचंबळून आलेल्या वसुंधरा अभियानाबाबतचे प्रेम, आपुलकी आणि जागरूकता बेगडी, दिखाऊ आणि प्रसिद्धीसाठी तर नाही ? अशी शंका अनेक अमरावतीकरांच्या मेंदूत गरगरायला लागली.
अगदी खरं सांगायचं तर काही चांगलं होत असलं की त्याबाबत शंका उपस्थित करणारे, आक्षेप घेणारे पायलीचे पन्नास तयार होतातच. त्याकडे किती लक्ष द्यायचे हा भाग वेगळा. तर आता प्रत्येक बुधवारी सायकल चालवतच महापालिकेत यायचं ही आयडिया मुळीच चुकीची नाही. अमरावती शहरात सगळ्या गावच्या वाहनांचे वाहनतळ महापालिकेचे आवार असेल तर प्रॉब्लेम हा नक्कीच क्रियेट होणार.

साहेबांचा आदेश निघाल्यावर महापलीलेतील सगळे अधिकारी, कर्मचारी जुन्या, नव्या, कुणी टपऱ्या- टुपऱ्या तर काहींनी आदेश मिळतच काल परवा विकत घेतलेल्या स्मार्ट सायकलने महापालिका गाठली. आता इतका छान उपक्रम राबवताना महापालिकेच्या आवारात असणाऱ्या बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही ‘बुधवारी सायकल आणारे बा’. हे असं सांगायला महापालिका प्रशासन विसरले आणि हे बँकवले गाड्या घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडकले. आज तर सायकलशीवाय इतर कोणत्याही वाहनांसाठी फाटक उघडणार नाही अशा तोऱ्यात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी फटकासमोर,  फटकला चिटकेपर्यंत वाहन उभी करायला लावली. मात्र साहेबांचा आदेश पक्का पाळला.

कोरोना वगैरे विसरून दिवाळीनिमित्त शहरात प्रचंड म्हणजे अति प्रचंडच गर्दी वाढली आहे. या गर्दीचा सर्वात मोठा ताण हा राजकमल चौकाकवरच अधिक पडतो. आशा परिस्थिती महापलीलेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभ्या दुचाकींमुळे मुख्य मार्गावरून पायी जाणारे, दुचाकीवरून जाणारे मधातच चारचाकी आल्याने जी काही तारांबळ सुरू होती ते पाहून वसुंधरा अभियान दिवाळीच्या महिन्यातील आठवड्यात एक दिवस सायकल घेऊन महापालिकेत आल्यानेच यशस्वी होतो या ज्यांना सुचलं, वाटल त्यांना तर हातच जोडावे अशीच परिस्थिती अमरावतीकरांना अनुभवायला आली.
एक वाटतं कोरोनाकाळात काम केल्यावर अनेक विभागाच्या वरिष्ठांना नक्कीच काही आगळ- वेगळं अधिक सुचायला लागलं असावं का? आता काल परवा पक्षी सप्ताह साजरा करायचा म्हणून वन्य जीव विभागाने अधीकारी आणि कर्मचाऱ्यामचे क्रिकेटचे सामने आयोजित केले. आणि हो मुख्य शहरात जिथे सध्या प्रचंड गर्दी होते आहे तिथे वाहतूक पोलीस न नेमता अगदी कठोरा नाका, वलगाव मार्ग, राहटगाव मार्ग या भागात एकाच वेळेस एकाच ठिकाणी डझनभर वाहतूक पोलीस उभे करून दिले. फटाके फोडू नका असं नागरिकांना आवाहन करायचं आणि फटके विक्रीसाठी शहरातील मुख्य मैदानात व्यवस्थाही करून द्यायची .खरं तर कोरोनाचा इम्पॅक्ट सगळ्या अधिकाऱ्यांवर हा असा विचित्र जाणवतो आहे.

महापालिकेचा सायकल उपक्रम तर ग्रेटच. झाडं लावायची मोहीम ठेवली बाजूला, शहरातील वडाळी आणि छत्री तलावातील कचरा, घाण दिला सोडून आणि वसुंधरा अभियानासाठी केवळ आणि केवळ सायकल शो दिवाळीनिमित्त बाजारात आलेल्या आणि महापालिकेसमोरून जाणाऱ्या अमरावतीकरांसाठी किती वेदनादायी ठरला हा ज्याचा त्यालाच माहिती. चांगला उपक्रम खरं तर राबविला गेलाच पाहिजे. सायकलला प्रमोट करणे ही आहेच काळाची गरज मात्र परिस्थितीचे भान असणं त्याहून गरजेचं आहे ना.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments