Home ताज्या घडामोडी खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर निवड

खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर निवड

अमरावती
लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आदेशाने समितीचे सद्स्य म्हणून निवड झाली आहे.

देशातील इतरही महिला खासदार या समितीचे सदस्या आहेत. थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे माध्यमातून या समितीद्वारे महिला धोरणं ठरविण्यासाठी खासदार राणा यांना संधी मिळणार आहे. देशातील विविध राज्यात महिलांच्या अत्याचार प्रकरणात या समितीचे माध्यमातून जाब विचारला जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष यांनी आदेश काढून त्यांचे आदेशाचेनुसार अतिरिक्त सचीव कल्पना शर्मा यांनी पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना नियुक्त केले आहे. ही समिती किंवा समितीचे सदस्य ज्या ज्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत अन्याय होत आहे असे वाटते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती काम करेल ही समिती त्यांच्या सूचना, अभिप्राय माननीय लोकसभा अध्यक्ष यांचेसमोर ठेऊन त्यावर अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष घेतील न्यायोचित धोरण निश्चित होईल-ठरविल्या जाईल.या माध्यमातून देशातील ज्या ज्या महिलांच्या बाबतीत अन्याय होत असेल अश्या घटकांनसाठी खासदार नवनीत राणा हया काम करतील राणा त्यांनी या समितीबाबत भावना,आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वीही खासदार नवनीत राणा यांनी महिलांच्या अत्याचारसबंधी लोकसभेत आपला आवाज बुलंद करून प्रश मांडले आहेत.आणखीन एक आयुधं या समितीचे माध्यमातून राणा यांना उपलब्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माननीय अध्यक्ष लोकसभा ओम बिरला यांचे खासदार नवनीत राणा यांनी आभार मानले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments