Home ताज्या घडामोडी अमरावतीकर बॉलिवूड अभिनेता आसिफ बासरा यांची हिमाचल प्रदेशात आत्महत्या

अमरावतीकर बॉलिवूड अभिनेता आसिफ बासरा यांची हिमाचल प्रदेशात आत्महत्या

अमरावती

अमरावतीच्या व्यंकय्या पुरा येथील मूळ रहिवासी आणि ज्ञाममता हायस्कुल व विदर्भ महाविद्यालयाचा विद्यार्थी असणारा बॉलीवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी गुरुवारी रात्री हिमाचल प्रदेशात धर्मशाला येथे गळफास लावून आत्महत्या केली.

आसिफ यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार आसिफ हे आपल्या परदेशी मैत्रिणीसोबत धर्मशाला येथे एका भाड्याच्या घरात राहत होते.

असं सांगितलं जात आहे की गुरुवारी दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्यावर फिरायला घेऊन गेले होते. कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर ते घरी परतले आणि नंतर त्याच पट्ट्याला लटकून त्यांनी गळफास लावून घेतला. सुरुवातीच्या तपासात या प्रकरणाला आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे.
प्राथमिक तपासात आसिफ नैराश्यग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. आसिफ बसरा यांनी ‘परजानियां’, ‘ब्लैक फ्राईडे’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘क्रिश ३’, ‘एक विलन’, ‘मंजुनाथ’, ‘जब वी मेट’ या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.
मूळचे अमरावतीकर असणाऱ्या आसिफ बसरा यांचे शालेय शिक्षण ज्ञाममाता हायस्कुल मध्ये झाले. ते 1984 च्या दहावीच्या बॅचला ज्ञानमात हायस्कुलचे ते विद्यार्थी होते. विदर्भ महाविद्यालयातून त्यांनी भौतिक शास्त्र विषयात बीएससी केले. लहानपणापासून नाटकाची आवड असणाऱ्या आसिफ यांनी बॉलिवूड मध्ये आपला ठसा उमटविला होता.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments