Home ताज्या घडामोडी डॉ. नितीन धांडे यांच्या विजयासाठी पक्ष एकवटला : चंद्रशेखर बावनकुळे

डॉ. नितीन धांडे यांच्या विजयासाठी पक्ष एकवटला : चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी डॉ. नितीन धांडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. डॉ. धांडे यांच्या विजयासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले असून, विजय आमचाच होणार, असा विश्वास भाजपचे नेते चंद्र कांत बावनकुळे यांनी व्यक्त केला.


दिवाळीच्या आदल्या दिवशी 13 नोव्हेंबरला राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर भाजपच्यावतीने चुन भाकर आंदोलन केले जाणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी चंदशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीन धांडे यांच्या विजयासाठी पाचही जिल्ह्यतील भाजप कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगून विजय आमचा होणार असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी डॉ. नितीन धांडे यांनी माझे शिक्षण क्षेत्रातील काम सगळ्यांना माहिती आहे. शिक्षकांसाठी एक चांगला पर्यय म्हणून मला निवडून द्यायला हवं अशी अपेक्षा यावेळी डॉ. नितीन धांडे यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, शिक्षक मतदान संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments