Home ताज्या घडामोडी लोणार सरोवर झाले रामसर पाणथळ

लोणार सरोवर झाले रामसर पाणथळ


रामसर म्हणजे, नेमकं काय…? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल..?
इराण देशातील ‘रामसर’ शहरात दि.२ फेब्रुवारी १९७१ रोजी संपूर्ण जगभरातील देशांची पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी एक परिषद भरवण्यात आली होती. यावेळी पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी काय करता येईल यावर त्या परिषदेत विचार विनिमय करण्यात आला. या परिषदेत झालेल्या ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव सन १९७५ पासून अंमलात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने हा करार दि.०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्विकारलाय. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्याने जगातील सर्व पाणथळ जागांचे संवर्धन तसेच शास्वत उपयोग करणे व शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.
आता महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामसर पाणथळ स्थळ ठरले आहे. लोकहीतार्थ असलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि वनमंत्री संजय राठोड यांचे विशेष आभार..!

यादव तरटे, पाटील
सदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments