Home ताज्या घडामोडी ऐन दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा रस्त्यावर : कारागृहासमोर धरणे

ऐन दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा रस्त्यावर : कारागृहासमोर धरणे

अमरावती

संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी या मागणीसाठी मोझरी येथे आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा तिवसा पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी शुक्रवारी रात्री कारागृहात केली. आमदार रवी राणा आणि त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी भेटायला आलेल्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अडवताच त्यांनी कार्यकर्त्यांसह कारागृहासमोरच रसत्यावर बसून धरणे दिल्याने खळबळ उडाली.

दरम्यान आमदार रवी राणा यांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी दोन दिवसांपासून युवा स्वाभिमन पार्टीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. दिवाळीच्या पर्वावर आमच्या कार्यकर्त्यांना अटक करणे थांबवा अशी मागणी यावेळी खासदार नवनीत राणा यांनी केली. दरम्यान शेतकऱ्यांना न्याय देण्यास सक्षम नसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला रविवारी रात्री मुंबईला जाणार असून शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव त्यांना करून देणार असे खासदार नवनीत राणा यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आमची भेट टाळली तर मातोश्री समोर आंदोलन सुरू करणार असा इशारा देखील खासदार नवनीत राणा यांनी दिला.
यावेळी कारागृहासमोर पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात फ्रेजारपुरा पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments