Home वन वंदे मातरम फाउंडेशनची पाच आदिवासी गावांना दिवाळी भेट

वंदे मातरम फाउंडेशनची पाच आदिवासी गावांना दिवाळी भेट

अमरावती
सातपुडा पर्वत रांगेत दुर्गम भागात वसलेल्या मेळघाटातील पाच गावांमधल्या आदिवासी कुटुंबांना अमरावतीच्या वंदे मातरम फौंडेशनच्यावतीने दिवाळी निमित्त खास भेट दिली आहे.

कुटीदा, सुनिता, टेम्ब्रू, खरी आणि सरवर या मेळघाटातील पाच गावांपैकी तीन गावनपर्यंत आजही विद्युत पुरवठा झाला नाही. या गावांमध्ये वंदे मातरम फाउंडेशनच्यावतीं सोलर दिवे लावण्यात आले.या पाचही गावातील सर्व कुटुंबांना ब्लॅंकेट, साडी, धोतर, लुगडं, शर्ट, टी-शर्ट, पॅन्ट, लहान मुलांचे कपडे, चप्पल, बूट, शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, खेळणे यासह चिवडा, शंकरपाळे असे दिवाळीच्या फरालाचेही वितरण करण्यात आले.
संस्थेचे अद्यक्ष नरेंद्र दापुरकर,सचिव पंकज उभाड, सचिन वानखडे, शैलेश वानखडे , शैलेश ठुसे, संजय शेळके, रमेश धारमकर , प्रमोद काकडे, राऊल भोंडे, अमित जामोदे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments