Home ताज्या घडामोडी आमदार रवी राणा यांची जामिनावर सुटका; आता मोर्चा 'मातोश्री'वर

आमदार रवी राणा यांची जामिनावर सुटका; आता मोर्चा ‘मातोश्री’वर

अमरावती
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना गुरुकुंज मोझरी येथे शुक्रवारी आमदार रवी राणा यांना अटक केल्यावर खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात आंदोलन पेटले. रविवारी नवनीत राणा यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे ठिय्य आंदोलन सुरू असताना आमदार राणा यांनी न्यायालयातून जामीन मिळविल्यावर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहाबाहेर येताच आता मोर्चा मातोश्रीवर असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला.

आमदार रवी राणा आणि त्यांच्यासोबत शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधात खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात युबस्वाभिमन पार्टीच्यावतीने रविवारी राजकमल चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. खासदार नवनीत राणा यांनी जयस्तंभ चौक येथील राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करून अभिबदन केले. यानंतर जयस्तंभ चौक ते राजकमल चौक पर्यंत युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी राजकमल चौकापार्यंत मोर्चा काढला.
राजकमल चौकात खसदर नवनीत राणा ठिय्य आंदोलन करीत असताना कादयकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता पोकीसानी पुतळा होत केला. यानंतर कार्यकर्त्यांनी दुसरा पुतळा आणून गांधी चौक मार्गावर पेटवून दिला.दरम्यान आंदोलन सुरू असतानाच आमदार रवी राणा यांची सुटका झाल्याची माहिती समोर आली. आमदार रवी राणा जुमानत घेऊन कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष केला.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीची ही लढाई कायम राहणार असून आता उद्या मुंबईला मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली तर मटतोश्री समोर आणदोलन छेडणार असे खासदार नवनीत राणा आणि आमदार रावी राणा यांनी जाहीर केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments