Home ताज्या घडामोडी राणा दाम्पत्याला अटक ; चार तास ठेवले पोलीस आयुक्तालयात

राणा दाम्पत्याला अटक ; चार तास ठेवले पोलीस आयुक्तालयात

अमरावती

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शुक्रवार पासून आमदार रवी राणा आणि खासदार नावणीत राणा यांनी आंदोलन छेडले आहे. रविवारी काही शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी राणा दाम्पत्य घराबाहेर निघणार असताना पोलिसांनी दोघांनाही अटक केली. यानंतर दोघांनाही चार तासांपर्यंत पोलिस आयुक्तालयात थांबवून ठेवण्यात आले.

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत द्यावी, चार महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणा व युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आमदार रवी राणा यांना कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. सोमवारी राणा दाम्पत्य मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भेटणार होते. मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.’मातोश्री’वर धडक देण्याच्या तयारीत असलेल्या राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली.

विदर्भ एक्सप्रेस रोखली

बडनेरा रेल्वे स्थानकावर युवासाभिमानचे कार्यकर्ते आणि शेतकरी विदेभं एक्सप्रेस मध्ये बसले असताना खासदार आणि आमदारांसाठी कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. गाडी अडविल्याने रेल्वे पोलिसांनी 22 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री 10 वाजता राणा दाम्पत्याची पोलीस आयुक्तल्यातून सुटका करण्यात आली.

खासदार नवनीत राणा म्हणाल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केवळ शेतकऱयांच्या प्रश्नावर निवेदन देण्यास आम्ही निघणार होतो मात्र मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटली

कुठलेही कारण नसताना खासदार आणि आमदाराला अटक करण्याचे आदेश देणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांसह अमरावती पोलीस आयुक्तांवर कारवाई व्हावी यासाठी लोकसभेत प्रश्न मांडणार

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments