Home ताज्या घडामोडी राणा दाम्पत्याच्या अटकेचा देवेंद्र फडणवीस यांनी केला निषेध

राणा दाम्पत्याच्या अटकेचा देवेंद्र फडणवीस यांनी केला निषेध

मुंबई

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली आहे. लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

 

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत व लॉकडाऊन काळातील विजेचे बिल अर्धे माफ करावे. या मागण्यांसाठी राणा दाम्पत्य रविवारी सायंकाळी विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला निघणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या वर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली म्हणून आंदोलन केलं तर कारागृहात डांबले. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन मातोश्रीवर भेटण्यासाठी रेल्वेनं निघाले, तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध. २५- ५० हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments