Home ताज्या घडामोडी नितेशकुमार मुख्यमंत्री ; रिमोट कंट्रोल मात्र भाजपकडे

नितेशकुमार मुख्यमंत्री ; रिमोट कंट्रोल मात्र भाजपकडे

पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री म्हणूनतीशकुमार आज सटव्यांदा शपथ घेणार आहेत. दरम्यान नितीश कुमार मुख्यमंत्री असले तरी यावेळी राज्यची सूत्र दुसर्‍याच्या कुण्याच्या तरी हाती असेल. आणि नितीश हे त्या रिमोट कंट्रोलवर काम करतील, असं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हंटले आहे. भाजपने राजकीय खेळी करून नितीशकुमार यांची ताकद कमी केलीय, असा आरोपही अन्वर यांनी केला आहे.

नितीशकुमार हे पूर्वी एनडीए आघाडीचे मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. पण यावेळी भाजप त्यांना आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री बनवत आहे, असं अन्वर म्हणाले. दरम्यान, बिहारमध्ये नितीशकुमार यांची एनडीएने विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीशकुमार हे आमदारांसह राज्यपालांना भेटले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. नितीशकुमार हे सातव्यांदा
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतील.तारिक अन्वर यांच्या कॉंग्रेस पक्षाने महाआघाडी अंतर्गत बिहारमध्ये एकूण ७० जागा लढवल्या. पण फक्त १९ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. जागावाटपातील दिरंगाईमुळे आवश्यक तेवढा प्रचार करता आला आहे, हे पराभवाचं कारण असल्याचं तारिक अन्वर या आधी म्हटले होते. तसंच बिहारमध्ये सत्ता बदलाची लाट आली. पण ही संधी आम्हाला मिळवता आली नाही, असं तारिक अन्वर यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments