Home सांस्कृतिक दिवाळी अंकाची महाराष्ट्रीय परंपरा ‘शब्दोत्सव’ने पुढे चालवावी : ऍड दिलीप एडतकर

दिवाळी अंकाची महाराष्ट्रीय परंपरा ‘शब्दोत्सव’ने पुढे चालवावी : ऍड दिलीप एडतकर

अमरावती

दिवाळी अंकांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. नव्या पिढीने ही परंपरा जपली. प्रीती बनारसे रेवणे ही नव्या पिढीतली संपादक धाडसाने दिवाळी अंक काढते, ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाने ही परंपरा पुढे चालवावी. कोरोनाच्या या काळात अनेकजण आर्थिक संकंटांचा सामना करीत आहेत.त्यातही एक तरूणी एक दर्जेदार दिवाळी अंक काढते, ही अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन या अंकाचे प्रकाषक तथा दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनी काढले. ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाषनप्रसंगी ते बोलत होते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला सातुर्णा एम.आय.डी.सी. स्थित ममता प्रकाषनच्या कार्यालयात या अंकाचे प्रकाषन झाले.यावेळी विचारपीठावर दिलीप एडतकर, वंदना एडतकर, भालचंद्र रेवणे, अविनाष दुधे, सनत आहाळे, रेवणे, डॉ. मोहना कुळकणी, डॉ. सतीष पावडे, डॉ. निषा शेंडे, सुनील यावलीकर, अनिता कुळकर्णी, संगीता हातगावकर, डॉ. हेमंत खडके, डॉ शोभा गायकवाड, हर्षल रेवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविक भूमिका शब्दोत्सवच्या संपादक प्रीती बनारसे यांनी मांडली. महाविद्यालयीन जीवनापासून विविध कॉलेज मॅगझिन्सच्या संपादनाचा अनुभव कामात आल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. स्त्रिविषयावर अंक काढणं हे दिव्यच होतं. त्यात परिवाराने आणि हितचितंकानी त्यांना मोलाची साथ दिली. त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मीडिया वॉचचे संपादक अविनाष दुधे यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकाचा धावता आढावा घेतला. त्यातही संपादक प्रीती बनारसे रेवणे यांचे कौतुक केले. त्यांच्या प्रतिभेच्या कक्षा खूप मोठ्या असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. शब्दोत्सवचा अंक देखणा आणि दर्जेदार आहे. अत्यंत समर्पण भावनने संपूर्ण टीमने यावर घेतलेले परिश्रम या अंकातून झळकतात, असंही ते यावेळी म्हणालेत.

प्रकाषन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी डॉ. मोहना कुळकर्णी यांनी दिवाळी अंकाच्या परंपरेवर चर्चा केली. दिवाळी अंकाच्या संपादक म्हणून प्रीती बनारसे रेवणे यांच्या कार्यकुषलेची त्यांनी दखल घेतली. दर्जेदार साहित्य, साहित्यिक आणि रसिक चोखंदळ वाचक यांच्यातला दुवा संपादक असतो. त्याला दोन्ही बाजूंचा अभ्यास करून अंकाची मांडणी करावी लागते. हा समन्वयात्मक समतोल शब्दोत्सव दिवाळी अंकाने सांभाळल्याबद्दल त्यांनी टीमचे अभिनंदन केले.

डॉ. निषा शेंडे यांनी शब्दोत्सवाच्या वाड्मयीन मूल्यांवर चर्चा केली. स्त्रियांच्या भावविष्वाचा साहित्यातला अविष्कार यावरही उहापोह केला. प्रीती यांनी या अंकातून हे विष्व व्यापक केल्याचंही त्या यावेळी म्हणाल्यात.

शब्दोत्सव दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार सुनील यावलीकर यांनी काढलं. त्यावर त्यांनी रसाळ भाष्य केलं. शब्दोत्सव दिवाळी अंकाची थीम ‘मास्क’ आहे. मुखपृष्ठावरील स्त्रिप्रतीक, त्यावरील रंग, शैली यावर त्यांनी विवेचन केलं.
पत्रकार आणि लेखिक अनिता कुळकणी यांनी शब्दोत्सवाच्या विषयावर चर्चा केली. वेळेचं नियोजन करून दर्जेदार अंक काढल्याबद्दल त्यांनी शब्दोत्सवाच्या टीमचं कौतुकही केलं.

ज्येष्ठ पत्रकार सनत आहाळे यांनी अंकातील साहित्याचर चर्चा केली. संपादक या नात्याने प्रीती यांनी घेतलेल्या विवेकी भूमिकेचं कौतुक केलं. एका विषयाच्या विविधांगी लेखनाचा वाचक आस्वाद घेतील अषी आषाही त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नाटककरा, रंगकर्मी प्रा. डॉ. सतीष पावडे यांनी शब्दोत्सवाच्या निमित्तानं अनुभवकथन केलं. अनेक वर्ष त्यांनी काढलेल्या दिवाळी अंकांचे अनुभव शेअर केलेत. विसाव्या षतकाच्या आरंभी तानुबाई बिरजे या महिला संपादक होत्या. त्यानंतर फारच मोजक्या स्त्रिसंपादक आल्यात. आजही स्त्री संपादकांची संख्या कमी आहे. शब्दोत्सवाची संपादक एक स्त्री असल्याने हा अंक एका वेगळ्या उंचीवर गेल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. हेमंत खडके यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. दिवाळी अंक संस्कृती जपतात. दिवाळी अंकांच्या वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो, असंही ते म्हणालेत. सुनील यावलीकरांनी काढलेल्या मुखपृष्ठावरही त्यांनी चर्चा केली. महिलांकडून पुरुषांचं प्रबोधन होणं आवष्यक असल्याचंही ते म्हणालेत.

साहित्यिक शोभा गायकवाड यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकाच्या ‘मास्क’ आणि स्त्री या थीमवर चर्चा केली. विविध साहित्यातून आलेल्या स्त्रिविष्वावरही भाष्य केलं. संपादक प्रीती बनारसे रेवणे या मल्टिटॅलेंटेड आहेत. त्यांच्या प्रतिभेची चुणूक या अंकात पाहायला मिळते, असंही त्या म्हणाल्यात.

शब्दोत्सव दिवाळी अंकाच्या प्रकाषन सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदीच कौटुंबिक स्वरूपात झाला. सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाकाळातील सर्व नियमांचं पालन करून हा सोहळा झाला. कार्यक्रमाचं संचालन प्रा. प्रसेनजीत तेलंग यांनी केले. आभार भालचंद्र रेवणे यांनी मानलेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments