Home ताज्या घडामोडी मंदिर उघडण्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि सरकारचे : जयंत पाटील

मंदिर उघडण्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि सरकारचे : जयंत पाटील

अहमदनगर

कोरोनामुळे गत 8 महिन्यांमपासून बंद असणारे राज्यातील धार्मिक स्थळे आज पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर भाजपने श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू केला आहे. भाजपने काही ठिकाणी आज आनंदोत्सवही साजरा केला. भाजपच्या या प्रकराबाबत
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे,असं पाटील यांनी नगरमध्ये बोलताना म्हंटले आहे.. तसेच मंदिर उघडण्याचे श्रेय हे मुख्यमंत्री व राज्य सरकारचे आहे,’ असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद करण्याबाबत नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला होता, असे सांगत पाटील पुढे म्हणाले, ‘देशामध्ये आजही करोना अस्तित्वात आहे. राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रुग्ण आहेत. हे रुग्ण कमी कसे करायचे, यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्न करीत होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट हळूहळू उघडायची आणि करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही, असा आमचा प्रयत्न होता. रेल्वे चालू झाल्या, बाकीचे व्यवस्था चालू झाल्या, आता शेवटच्या टप्प्यात प्रार्थनास्थळे चालू करण्याचा निर्णय घेतला. पण भाजपला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते. भाजपने काही महिन्यापूर्वीच मंदिराच्या बाहेर जाऊन थाळीवादन केले. करोना राहिला बाजूला. करोना रुग्ण कमी कसे होतील त्यासाठी भाजपची मदत, सूचना, सहकार्य असते तर मी समजू शकलो असतो. उलट करोना रुग्ण कसे वाढणार नाही, हे प्रयत्न सगळ्यांनी करायचे असतात. जसे आम्ही केंद्रात विरोधी पक्षात असताना देखील नरेंद्र मोदी यांचे जे म्हणणे असेल ते आम्ही ऐकून घेतले. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने राजकारण करायचे नाही, ही आमची भूमिका होती. मात्र महाराष्ट्रात भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments