Home ताज्या घडामोडी राणा जिंकले

राणा जिंकले

आणि पाहता पाहता घाड्यात नऊ वाजत आले होते. पोलीस उपयुक्तांसह राजापेठ आणि फ्रेजारपुरा पोलोस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्तलायत ठाण मांडून होते. राणा दाम्पत्याला नेमकं कोणत्या कारणावरून स्थानबद्ध करण्यात आले होते याचे कारण त्यांना राणा दाम्पत्याला लिहून द्यायचे होते . शांतता भासत असताना सगळी गडबड सुरू होती. तशी ही गडबड दिवाळीच्या आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीभूमीतून सुरू झाली. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची साधी चौकशीही करत नाही असा आरोप करून बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी गुरुकुंज मोझरी येथून आंदोलनाला सुरुवात केली. आता राणा म्हणजे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना टोचणारा काटा. हा काटा रुतायला नको, हा काटा जवळ यायला नको आणि या काट्याच्या कटकटीपासून दूर राहिलेलंच बर याची अगदी चांगली जाणीव जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांना बऱ्यापैकी झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सुरू झालेले राणांचे आंदोलन असो, राणांना झालेली अटक असो, राणांच्या अटकेनंतर खासदार राणा यांनी धारण केलेले रौद्ररूप असो सगळ्याच पक्षातले सगळे अगदी चिडीचूप. आपण जिल्ह्याच्या पालकमंत्री असलो तरी आपल्या तिवसा मतदार संघात केवळ आंदोलन होते आहे ना .पाहतील पोलीस असे समजून यशोमती ठाकूर यांनीही दिवाळीत घडत असलेले राणा प्रकरण गांभीर्याने घेतले जरी असले तरी गांभीर्य दाखविण्याचे टाळले. खर तर हा सगळा अनुभवाचा भाग. डोकेदुखी आपल्या मागे लावून घ्यायची नाही तर शांत बसलेलंच बर. हे शहाणपण आता सगळ्या नेत्यांना गवसलेलं.

खरं बोलायचं तर राणा दाम्पत्य काही गमतीचा भाग मुळीच राहिलेले नाहीत. ‘दिवाळीचा किराणा वाटायचा नव्हता म्हणून कारागृहात गेले. ही नेहमीची नौटंकी.’ ‘या दोघांना काय दिवाळी. यांची तर रोजचीच दिवाळी त्यामुळे ऐन दिवाळीत तमाशा करणं आणि कारागृहात जाण हा प्रकार केवळ पॉप्युलर व्हायचा फंडा.’ असे मागे फटाके फोडणाऱ्यांची संख्या पूर्वीपेक्षा कमी असली तरी ती आहेच या सगळ्या प्रकरणाला.राजकारणाची किनार नक्कीच असली तरी दिवाळी असो वा दसरा कारागृहात रात्र काढणं ही गंमत नाही. पॉप्युलर व्हायचा भाग म्हंटल तर अख्ख्या महाराष्ट्र्रात आणि अर्ध्या देशात राणा जोडी हिट आहेच. दिवाळीच्या दिवशी आंदोलन छेडणे, या आंदोलनात कार्यकर्त्यांची फौज वाटेल ते करायला सज्ज असणे. आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आता आंदोलन छेडण्याची तयारी करणे ही साधी बाबा नव्हतीच. चक्क खासदाराला आणि आमदाराला घरून ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तलायत स्थानबद्ध करतात आणि आपण हे का करतो आहे याचं करणं शोधत बसणं ही खरी तर पोलिसांची झालेली पंचाईत घड्याळीचा काटा नऊच्या समोर सरकला तेव्हाही झालेली दिसत होतीच.

अगदी याच वेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्याच्या बाजूने ट्विट करताच रणांच्या प्रत्येक निवडणुकीत राणांविरुद्ध आगपाखड करणाऱ्या भाजपच्या मंडळींणी सोशल मीडियावर जणू राणा आपले आदर्श आहेत अशा शब्दात राणांचे भरभरून कौतुक करण्यास सुरुवात केली. आम्हला अटक केली याचे कारण लिहून द्या तरच आम्ही घरी परतू अशी भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. आणि आपण का राणा दाम्पत्याला अटक केली हे कारण देणे भाग असल्याने घड्याळीचा काटा सव्वा नऊच्या पार सरकत असताना राणांचे तीन तीन वकील जे तुम्ही केले तेच लिहून हवे यावर ठाम असल्याने पोलिसांची तारांबळ सुरूच होती.
पोलिसांची तारांबळ उडण्याचे कारण म्हणजे आता हा विषय लोकसभेत मांडणार आणि आम्हाला कोणत्या नियमात घरून उचलून आणून स्थानबद्ध केले असे मुंबई आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना सांगावे लागणारच असा दम खासदार नवनीत राणा यांनी भरला. तर विधानसभेत उद्धव ठाकरे यांना जाब विचारणार असे आमदार राणा म्हणत होते. घड्याळ पुढे पुढे सरकत असताना शहरातील काही समजदार शिवसैनिक उद्धव ठाकरे यांनी या नौटंकीला मुंबईला येण्यापासून रोखले हा मोठा मूर्खपणा केला असे बोलत होते तर हे गेले असते तर मुंबईत मार खाल्ला असता आशा प्रतिक्रिया देणारेही अनेक सच्चे शिवसैनिक होते. आता जे काय घडलं ते सर्वांसमोर आहेच. उद्धव ठाकरे राणांना घाबरले? उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे राणा होते, नव्हते त्यापेक्षा अधिक मोठे झाले? असे अनेक प्रश्न असले तरी राणा आज जिंकले हे मात्र नक्की.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments